#Ind vs Eng | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी टीम इंडिया आठवडाभर क्वारंटाईन

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

#Ind vs Eng | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी टीम इंडिया आठवडाभर क्वारंटाईन
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 2:14 PM

चेन्नई : ऑस्ट्रेलियाला चितपट केल्यानंतर भारतीय संघ पाहुण्या इंग्लंडविरोधात (Team India vs England) खेळण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात (England Tour India 2021) कसोटी मालिकेपासून होत आहे. “या कसोटी मालिकेच्या आठवडाभराआधी भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन (Team India Quarntine) रहावं लागणार आहे”, अशी माहिती टीम इंडियाचे बोलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) यांनी दिली आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हा पहिला सामना चेन्नईमध्ये खेळण्यात येणार आहे. (team india quarntine for week before england test series 2021)

भरत अरुण काय म्हणाले?

“ऑस्ट्रेलियात आम्ही धमाकेदार कामगिरी केली. आम्ही प्रत्येक विजयी क्षणाचा आनंद घेतला. पण आता हा आनंद विसरुन इंग्लंडविरोधातील मालिकेकडे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. यासाठी इंग्लंडविरोधात खेळण्यासाठी क्वारंटाईन असताना रणनिती आखणार”, असं अरुण म्हणाले.

“इंग्लंडविरोधातील प्रत्येक सामना आपल्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत काही अंशी इंग्लंडची फलंदाजी मजबूत आहे. आपण ऑस्ट्रेलियाविरोधात त्यांच्याच भूमित खेळत होतो. कांगारुंविरोधातील पहिल्या कसोटीत भारताचा डाव 36 धावांवर आटोपला. हे विसरण्यासाठी आम्हाला 2 दिवस लागले. आम्ही फार तणावात होतो. पण हे सर्व विसरुन आणखी जोमाने तयारी केली. अशीच तयारी इंग्लंडला आव्हान देण्यासाठी करायची आहे”, असं अरुण म्हणाले.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 4 मॅचची टेस्ट सीरिज खेळण्यात येणार आहे. या सीरिजमधील पहिले 2 सामने हे चेन्नई खेळण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या 2 सामन्यांना क्रिकेट चाहत्यांना उपस्थित राहता येणार नाही, असा निर्णय तामिळनाडू क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

IND vs ENG | इंग्लंडविरुद्धच्या कसोटींसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही, TNCA चा मोठा निर्णय

England Tour India | टीम इंडियाला भारतात पराभूत करणं अवघड : जो रुट

(team india quarntine for week before england test series 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.