AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Tour Sri Lanka 2021 | श्रीलंका दौऱ्यात भारताचं नेतृत्व कुणाच्या हाती?, या 2 नावांची सर्वाधिक चर्चा

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचं नेतृत्व कुणाकडे असणार यावरुन बरीच चर्चा रंगतीय. भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या या दोन नावांची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. (Team India Tour Sri Lanka 2021 Hardik Pandya or Shikhar Dhawan Can Captain of India)

India Tour Sri Lanka 2021 | श्रीलंका दौऱ्यात भारताचं नेतृत्व कुणाच्या हाती?, या 2 नावांची सर्वाधिक चर्चा
श्रीलंका दौऱ्यात शिखर धवन किंवा हार्दिक पांड्याला नेतृत्वाची संधी मिळू शकते.
| Updated on: May 12, 2021 | 6:40 AM
Share

मुंबई : टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India tour of Sri Lanka in July) जाणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) काही दिवसांपू्र्वी दिली. टीम इंडियाची बी टीम या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध प्रत्येकी 3 वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच वेळेस टीम इंडियाचा मुख्य संघ हा इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे सगळे अनुभवी खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने भारताची ताज्या दमाची टीम श्रीलंकेत खेळणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत भारताचं नेतृत्व कुणाकडे असणार यावरुन बरीच चर्चा रंगतीय. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) या दोन नावांची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. (Team India Tour Sri Lanka 2021 Hardik Pandya or Shikhar Dhawan Can Captain of India)

शिखर धवन प्रथम क्रमांकाचा दावेदार

भारतीय संघाचं नेतृत्व सांभाळण्यासाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) सक्षम आहे. याअगोदर त्याने आयपीएलमध्ये दिल्लीचं नेतृत्व यशस्वीपणे सांभाळलं होतं. त्यामुळे त्याच्यापाठीमागे कर्णधारपद सांभाळण्यासाठीचा अनुभव आहे. दुसरीकडे शिखर सध्या जोरदार फॉर्मात आहे. नुकत्याच आयपीएलच्या 14 व्या मोसमात त्याने शानदार प्रदर्शन केलंय. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा निघतायत. अशा परिस्थितीत शिखरला भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, ही अधिक शक्यता आहे.

हार्दिक पांड्याच्या नावाची चर्चा

मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या हे नाव मोठं आहे. भारतीय संघातील मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आतषबाजी होते, प्रसंगी कितीही अवघड असणारी मॅच त्याच्यामुळे सोपी वाटायला लागते, अशा हार्दिककडे श्रीलंका दौऱ्यात भारताचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, असा कयास बांधण्यात येत आहे. दुसरीकडे सध्या तो आऊट ऑफ फॉर्म आहे, पण अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर त्याचा फॉर्म परत येतो का, हे पाहणे महत्त्वाचं आहे.

Team India Tour Sri Lanka 2021 Hardik Pandya or Shikhar Dhawan Can Captain of India

श्रेयस अय्यर श्रीलंका दौऱ्यात खेळणार?

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलच्या 14 व्या मोसमात खेळू शकला नाही. आयपीएल सुरु होण्याअगोदरच त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. आताही श्रेयस अय्यर श्रीलंका दौऱ्यात खेळणार की नाही, याबद्दल स्पष्टता नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “श्रीलंका दौऱ्यापर्यंत तो फिट होईल की नाही, सध्या काहीच सांगू शकत नाही. सर्वसाधारणपणे श्रेयसवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर 4 महिने आराम करावा लागतो. जर श्रेयस श्रीलंका दौऱ्यात खेळला तर त्याला नेतृत्वाची संधी मिळू शकते.”

(Team India Tour Sri Lanka 2021 Hardik Pandya or Shikhar Dhawan Can Captain of India)

हे ही वाचा :

India tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर पारस महांब्रे प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची चिन्हं, संपूर्ण दौरा कसा असेल?

India Tour Sri Lanka 2021 | टीम इंडियाचे ‘हे’ 20 युवा शिलेदार श्रीलंकेत मैदान मारणार?

India tour of Sri Lanka 2021 | सामने कधी आणि कुठे? प्रशिक्षक कोण? राहुल द्रविडची भूमिका काय? जाणून घ्या सर्वकाही

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.