Special Story | टीम इंडिया की इंग्लंड, कसोटी मालिकेत वरचढ कोण? पाहा आकडेवारी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (team india vs england) यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

Special Story | टीम इंडिया की इंग्लंड, कसोटी मालिकेत वरचढ कोण? पाहा आकडेवारी
विराट कोहली आणि जो रुट
sanjay patil

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 30, 2021 | 8:38 AM

मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच (Team India Beat Australia In Test Series) भूमित कसोटी मालिकेत पराभव केला.   इंग्लंडनेही श्रीलंकेचा त्यांच्याच (England Beat Sri Lanka In Test Series) घरात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला. यामुळे या दोन्ही विजयी संघांचा विश्वास दुणावला आहे. आता हे दोन्ही संघ म्हणजेच इंग्लंड आणि टीम इंडिया आमनेसामने (India vs England Test Serirs) उभे ठाकले आहेत. या दोन्ही संघात 4 सामन्यांची द्विपक्षीय कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ चेन्नईमध्ये पोहचले आहेत. कसोटी मालिकेच्या निमित्ताने आपण दोन्ही संघांची एकमेकांसमोर आतापर्यंतची कसोटी मालिकेत कशी कामगिरी राहिली आहे, हे पाहणार आहोत. (team india vs england head to head test series stats)

कसोटी मालिकेत इंग्लंडचा वरचष्मा

आतापर्यंत दोन्ही संघामध्ये एकूण 33 टेस्ट सीरिज खेळण्यात आल्या आहेत. यामध्ये इंग्लंडचा वरचष्मा राहिला आहे. इंग्लंडने 33 पैकी एकूण 19 कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडने या 19 पैकी 5 मालिका भारतात जिंकल्या आहेत. इंग्लंडने 1933-34, 1976-77, 1979-80, 1984-85 आणि 2012-13 मध्ये भारताचा कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे.

तसेच टीम इंडियानेही 10 वेळा इंग्लंडवर कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. यापैकी टीम इंडियाने 7 वेळा इंग्लंडचा भारतात पराभव केला आहे. तर 1971, 1986 आणि 2007 अशा 3 वेळा इंग्लंडला त्यांच्याच भूमित पराभवाची धूळ चारली आहे. तर 4 मालिका या बरोबरीत राखण्यास दोन्ही संघांना यश आले.

कसोटीनिहाय आकडेवारी

उभयसंघात आतापर्यंत एकूण 122 कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी 47 सामने हे इंग्लंडने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 26 मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे. तसेच 49 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

चेन्नईमधील आकडेवारी

इंग्लंडच्या 2021 या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईमधील एम ए चिदंबरमध्ये खेळण्यात येणार आहेत. या चेन्नईमध्ये टेस्ट सामन्यात दोन्ही संघांचा 9 वेळा आमनासामना झाला आहे. या 9 पैकी 5 सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केलं आहे. तर इंग्लंडने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे.

दोन्ही संघांची जमेची बाजू

इंग्लंडविरोधातील या कसोटी मालिकेसाठी अनेक खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. यामध्ये इशांत शर्मा, हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि विराट कोहलीचा समावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगिरी केलेल्या नव्या दमाच्या शिलेदारांनाही संधी देण्यात आली आहे. तसंच इंगलंडकडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ऑलराऊंडर बेन स्टोक्सचं पुनरागमन झालं आहे.

दोन्ही संघांनी आपल्या गत कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. दोन्ही संघाच्या स्टार खेळाडूंचं पुनरागमन झांल आहे. यामुळे टीम इंडिया कसोटी मालिकेत आपली विजयी घोडदौड कायम राखणार की इंग्लंड हा विजयी रथ रोखणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(team india vs england head to head test series stats)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें