क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘टोक्यो ऑलिम्पिक 2021’च्या तारखा जाहीर

आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) 2021 ऑलिम्पिक खेळांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'टोक्यो ऑलिम्पिक 2021'च्या तारखा जाहीर

टोकियो : जगभरातील क्रीडाप्रेमी ज्या बातमीची (Tokyo Olympic 2021 Date Announced) वाट पाहत होते, ती बातमी अखेर आली आहे. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) 2021 ऑलिम्पिक खेळांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2021 मध्ये होणारं ऑलिम्पिक हे 2020 मध्ये नियोजित असलेल्या तारखेच्या एक वर्षांनंतर होईल. 2021 ऑलिम्पिक हे 23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत असणार (Tokyo Olympic 2021 Date Announced) आहेत. आज टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानंतर आयओसीने म्हटलं, “हा निर्णय तीन मोठ्या बाबींना लक्षात ठेऊन घेण्यात आला आहे. पहिली, जगभरातील खेळाडुंच्या आरोग्याची सुरक्षा, दुसरी ऑलिम्पिक खेळांचं महत्त्व आणि तिसरी जगभरातील इतर देशांचे खेळांची दिनदर्शिका.”

टोकियो ऑलिम्पिक 2020 का टाळावा लागला?

कोरोनाने (Corona Virus) संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोना जेव्हा चीनमधून इतर देशांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानला ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. मात्र, तेव्हा जपानने ऑलिम्पिक पुढे ढकलण्यास साफ नकार दिला (Tokyo Olympic 2021 Date Announced). त्यानंतर काहीच दिवसात कोरोनाने संपूर्ण जगात आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक देशांनी आपले खेळाडू जपानला पाठवण्यास नकार दिला.

अशा परिस्थितीत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटलं होतं की, कदाचित ऑलिम्पिक खेळांना एका वर्षांसाठी पुढे ढकलावच लागेल. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आयओसीचे सदस्य डिक पाऊंड म्हणाले होते, सध्याच्या स्थितीला पाहता टोकियो ऑलिम्पिक एक वर्षासाठी टाळावं लागेल. त्यानंतर नव्या कार्यक्रमाच्या नियोजनावर विचार करण्यात आला.

त्यानंतर आयओसीने 2021 ऑलिम्पिक खेळांच्या तारखा जाहीर केल्या. कोरोनाच्या संकटाला पाहता नव्या तारखा जाहीर करणे इतकं सोपं नव्हतं. त्यामुळे जगाला या कोरोना विषाणूपासून लवकरात लवकर मुक्तता मिळण्याची गरज आहे. नाहीतर ऑलिम्पिक प्रमाणे इतर खेळांवरही याचा परिणाम होईल आणि आपण आपले आवडते खेळ आणि खेळाडुंना मैदानावर पाहण्यासाठी खूप प्रतीक्षा (Tokyo Olympic 2021 Date Announced) करावी लागेल.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | बीसीसीआयचं एक पाऊल मागे, आयपीएल लांबणीवर!

कोरोनाची धास्ती, भारत वि. दक्षिण अफ्रिका सामना प्रेक्षकांविनाच

VIDEO: टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा ‘DSP’ रस्त्यावर, काही वेळातच शहर लॉकडाऊन

कनिका कपूरमुळे दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीम क्वारंटाईन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI