MI vs RCB IPL 2021 Match Prediction : मुंबईचा संघ बंगळुरुवर भारी, विराटच्या रेड आर्मीची चालणार का ‘दादगिरी’?

MI vs RCB IPL 2021 Match Prediction : मुंबईचा संघ बंगळुरुवर भारी, विराटच्या रेड आर्मीची चालणार का 'दादगिरी'?
Mumbai Indians Vs Royal Challengers Banglore

आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा आज श्रीगणेशा होतोय. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Banglore) यांच्यात होणार आहे.

Akshay Adhav

|

Apr 09, 2021 | 11:49 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा आज श्रीगणेशा होतोय. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर (MA Chidambram Stadium Chennai) खेळविण्यात येणार आहे. मुंबईचा संघ लाठोपाठ तिसऱ्यांदा आणि आयपीएल इतिहासात सहाव्यांदा आयपीएल स्पर्धेचं जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर इतिहासातली पहिली वहिली ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक असेल. या दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या सामन्यांत आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईचा पगडा भारी राहिला आहे. (Who Will Win MI vs RCB IPL Match Prediction previous match stats 09 April marathi)

मुंबईचा संघ बंगळुरुवर भारी, पाहा आकडेवारी

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये मुंबईचा संघ बंगळुरुवर वरचढ ठरला आहे. जर आपण दोन संघांमधील हेड टू हेड सामन्यांची तुलना केली तर 2008 पासून या दोन्ही संघांमध्ये एकूण 29 सामने खेळले गेले असून त्यात मुंबईने आतापर्यंत 19 सामने जिंकले आहेत. तर बंगळुरुने मुंबईविरुद्धचे केवळ 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्यात आरसीबीने मुंबईला सुपर ओव्हरमध्ये हरवलं होतं. फक्त इकतंच नाही तर मुंबईने पाठीमागच्या 10 सामन्यांत बंगळुरुला 8 वेळा पराभवाची चव चाखायला लावली आहे.

हॅट्रिकवर मुंबईची नजर

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा म्हणजेच सहा वेळा आयपीएल जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात असलेल्या संघाने प्रथम 2013 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. यानंतर मुंबईने 2015, 2017, 2019 आणि पुन्हा 2020 मध्ये आयपीएलचा करंडक जिंकला. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणय्याची संधी आहे. यासाठी रोहितच्या नेतृत्वाखालील टीम प्रयत्नांची पराकष्ठा करतीय.

बंगळुरुचा वितेजेपदाचा दुष्काळ संपणार

विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या आरसीबीने आणखी एकदाही आयपीएल करंडक जिंकलेला नाही. दरवर्षी आरसीबीकडे विस्फोटक खेळाडू असतात पण तरीही शेवटच्या क्षणी हा संघ निर्णायक मॅच गमावतो. आरसीबीने आतापर्यंत 3 वेळा आयपीएलची फायनल खेळली आहेत, पण अंतिम सामना जिंकण्यात त्यांना यश आलेलं नाही.

आज कुणाचा पगडा भारी..?

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सगळ्या संघांपेक्षा मुंबईचा संघ एक पाऊल पुढे आहे. साहजिक आजच्याही मॅचमध्ये मुंबईचं वजन आरसीबीपेक्षा भारी आहे. मुंबईच्या संघात सगळेच मॅचविनर खेळाडू आहेत. तर दुसरीकडे बंगळुरुचा संघ देखील कच्चा नाहीय. देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल अशा विस्फोटक खेळाडूंचा संघात भरणा आहे. साहजिक आजचा सलामीचा सामना प्रचंड रोमांचक होणार आहे.

(Who Will Win MI vs RCB IPL Match Prediction previous match stats 09 April marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने का खरेदी केलं? रोहित शर्माने सांगितली ‘राज की बात’!

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून घरी परतला

‘मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन’, गावस्कर यांच्यानंतर या दिग्गजाची भविष्यवाणी!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें