AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G चा स्पीड किती याची टेस्ट घेत होते, काही सेकंदात संपला डेटा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

वेगवेगळ्या कंपन्यांकडून 4G आणि 5G ची सेवा सुरु झाली खरी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ज्यांनी ते चेक केले होते.

5G चा स्पीड किती याची टेस्ट घेत होते, काही सेकंदात संपला डेटा, काय आहे संपूर्ण प्रकरण?
| Updated on: Oct 12, 2022 | 7:24 PM
Share

नवी दिल्लीः सध्या देशातील काही ठिकाणी 5G नेटवर्क (5G Network) लॉन्च केले गेले आहे. त्यामुळे आता सर्रास लोकं आपल्याही फोनमध्ये 5G चे नेटवर्क मिळण्याची वाट बघत आहेत. 5G नेटवर्क येताच काही लोकांनी 4G (4G Network) आणि 5G स्पीडमधील फरक बघण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र त्यानंतर झालेल्या प्रकारामुळे अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. मोबाईल (Mobile Users) धारकांना 5G नेटवर्क आल्यानंतर ते तपासून बघण्याची अनेक उत्सुकता लागून राहिली होती. त्याच उत्सुकतेमुळे नेटवर्क पाहण्याचा नादात मात्र अनेक त्याचा फटका बसला आहे. 5G नेटवर्क तपासण्याचा ज्यांनी प्रयत्न केला होता, त्यानी आपला अनुभव ट्विटरवरुन शेअर केला आहे.

वेगवेगळ्या कंपन्यांकडून 4G आणि 5G ची सेवा सुरु झाली खरी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ज्यांनी ते चेक केले होते, त्यांना मात्र मोठा फटका बसला आहे.

ते चेक करत असताना त्यांचा निम्म्याहून अधिक डेटा नष्ट झाला आहे. 5G नेटवर्क वापरल्यानंतर त्यांचा मोबाईल डेटा झपाट्याने संपत आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मोबाईल धारकांना 5G वर 1Gbps पर्यंत स्पीड मिळणे अपेक्षित आहे, तर भारतात मात्र सध्या 5G नेटवर्कचे स्पीड हे 500 ते 600Mbps इतकेच उपलब्ध आहे.

5G च्या उच्च स्पीडमुळे डेटादेखील जास्त वापरला जात आहे. तरीही इतर कारणांमुळे हा डेटा लवकर संपण्याची शक्यता आहे.

मोबाईलवर अनेक जण युट्यूबवरील व्हिडीओ पाहत असतात. मात्र इंटरनेचा वेग कमी असतो त्यावेळी मात्र व्हिडीओ पाहताना चांगली क्वालिटी मिळत नसते.

मात्र एकदा का इंटरनेचे स्पीड वाढले की, त्यासाठी डेटाही अधिक लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही जर 5G वर व्हिडिओ पाहिल्यास, असलेला डेटा कितीतरी वेगाने संपून जातो.

Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांच्यासाठी कोणतीही स्वतंत्र योजना अद्याप जाहीर केली गेली नाही. तर जिओ कंपनीने मात्र आपल्या यूजर्सना अमर्यादित 5G च्या डेटाची ऑफर देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे एअरटेल वापरकर्त्यांना सध्याचा डेटा प्लॅनवर 5G स्पीड मिळत आहे. तथापि, जिओची सेवा मात्र ही सेवा इनवाईट बेस्ड असल्याने निवडक यूजर्सनाच फक्त ते उपलब्ध झाले आहे.तर एअरटेलच्या बाबतीत मात्र असं झालं नाही.

नेटवर्क कंपन्यांकडून वापरकर्त्यांना 5G सेवा देत असते, मात्र त्यामध्ये तुम्हाला त्याचा डेटा मिळणार आहे. मात्र या परिस्थितीतही युजर्सचा डेटा झपाट्याने संपत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.