AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 रुपयांहून कमी किंमतीत ढासू प्रिपेड ऑफर्स, Airtel, Jio, BSNL आणि VI चे कॉलिंग आणि डेटा प्लॅन्स

दूरसंचार कंपन्या एअरटेल (Airtel), जिओ (Jio), बीएसएनएल (BSNL) आणि व्ही (VI) अनेक प्रीपेड प्लॅन आणि व्हाउचर देतात ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.

100 रुपयांहून कमी किंमतीत ढासू प्रिपेड ऑफर्स, Airtel, Jio, BSNL आणि VI चे कॉलिंग आणि डेटा प्लॅन्स
Jio, Airtel, Vi, Bsnl
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 8:46 AM
Share

मुंबई : दूरसंचार कंपन्या एअरटेल (Airtel), जिओ (Jio), बीएसएनएल (BSNL) आणि व्ही (VI) अनेक प्रीपेड प्लॅन आणि व्हाउचर देतात ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅन्समध्ये डेटा आणि टॉकटाईम फायदे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, बऱ्याच वेळा युजर्स जेव्हा अल्प काळासाठी लाभ हवेत किंवा फक्त प्लॅन सक्रिय ठेवू इच्छितात तेव्हा हे प्लॅन्स वापरतात. यापैकी काही प्लॅन्स ही इंटरनेट लाभांसह येतात. (Airtel vs Vi vs BSNL vs Jio prepaid plan under Rs 100, check all vouchers)

एअरटेल 100 रुपयांखाली अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते, ज्यात 19 रुपये, 48 रुपये, 49 रुपये आणि 79 रुपयांचे प्लॅन समाविष्ट आहेत. 19 आणि 48 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 200 एमबी डेटा उपलब्ध आहे आणि तोही दोन दिवसांसाठी. तर 49 आणि 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 100 MB आणि 200 MB डेटा मिळतो. त्याची वैधता 28 दिवस इतकी आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनी 100 रुपयांच्या खाली 16 रुपये, 19 रुपये, 39 रुपये, 48 रुपये, 49 रुपये, 79 रुपये आणि 98 रुपयांचे प्लॅन देते.

  • 16 रुपये – 1 जीबी डेटा 24 तासांसाठी, मूव्ही आणि टीव्ही शोचा अ‍ॅक्सेस
  • 19 रुपये – 200MB डेटा आणि अनलिमिटेड टॉकटाइम, व्हॅलिडिटी 2 दिवस.
  • 39 रुपये – कॉम्बो प्लॅन, ज्यामध्ये तुम्हाला टॉक टाईम आणि 100 एमबी डेटा मिळतो तोसुद्धा 28 दिवसांसाठी.
  • 48 रुपये – हा फक्त डेटा रिचार्ज प्लॅन आहे ज्यात तुम्हाला 28 दिवसांसाठी 3 जीबी डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला 200MB अतिरिक्त डेटा देखील मिळतो.
  • 49 रुपयांचा प्लॅन – हा एक कॉम्बो रिचार्ज प्लान आहे जो 28 दिवसांसाठी 300MB डेटा देतो.
  • 79 रुपयांचा प्लॅन – यामध्ये तुम्हाला 400MB डेटा मिळतो, तोही 64 दिवसांसाठी. याशिवाय तुम्हाला 200 MB अतिरिक्त डेटा देखील मिळतो.
  • 98 रुपयांचा प्लॅन – हा एक डबल डेटा प्लॅन आहे जो 28 दिवसांसाठी 12 जीबी डेटा देतो.

जिओचे प्लॅन्स

तुम्ही जर जिओ रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत असाल तर यामध्ये तुम्हाला 10, 20, 50 आणि 100 रुपयांचा प्लॅन मिळेल. हे प्लॅन तुम्हाला 1 जीबी, 2 जीबी, 5 जीबी आणि 10 जीबी डेटा देतात. या प्लॅनमध्ये 124, 249, 656, 1362 IUC मिनिटांचा टॉकटाइम देखील उपलब्ध आहे.

BSNL चे प्लॅन्स

तुम्हाला BSNL बद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला 97, 99 रुपयांचे प्लॅन्स मिळतील, जे 18 दिवस आणि 22 दिवसांच्या वैधतेसह येतात. कंपनी 97 रुपयांचा प्लॅन डेटा व्हाउचर देते आणि दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस देते. 99 रुपयांचा व्हाउचर प्लॅन 22 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला एक व्हाउचर देखील मिळते ज्याची किंमत 98 रुपये आहे आणि यात दररोज 2 जीबी डेटा मिळतो आणि याची वैधता 22 दिवसांसाठी असेल. BSNL येथे 94 रुपयांचे डेटा व्हाउचर देते जे 75 दिवसांच्या वैधतेसह येते. यामध्ये तुम्हाला 3 जीबी डेटा आणि 100 मिनिटे मोफत व्हॉईस कॉल मिळतात. त्याचबरोबर एक प्रीपेड व्हाउचर देखील आहे जे 75 रुपयांचं आहे. हे 50 दिवसांच्या वैधतेसह येते आणि 2 जीबी डेटासह 100 मिनिटे मोफत कॉल ऑफर करते.

इतर बातम्या

Vodafone-Idea चे दोन ढासू प्लॅन लाँच, कुटुंबातील 5 सदस्यांच्या मोबाईलवर सर्वकाही FREE

108MP कॅमेऱ्यासह Moto चे दोन ढासू स्मार्टफोन भारतात लाँच, कमी किंमतीत दमदार फीचर्स

Vivo Special Offer : स्मार्टफोनची स्क्रीन फुटली तर मोफत बदलून मिळणार, 10000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स

(Airtel vs Vi vs BSNL vs Jio prepaid plan under Rs 100, check all vouchers)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...