भारतात WhatsApp वर मोठी कारवाई, जानेवारीत 29 लाख खाती बंद

WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी भारतातील तब्बल 29 लाख खाती बंद करून टाकली आहेत.

भारतात WhatsApp वर मोठी कारवाई, जानेवारीत 29 लाख खाती बंद
whatsappImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 7:45 PM

नवी दिल्ली : लोकप्रिय इन्स्टन्ट मॅसेजिंग एप व्हाट्सअपने मोठी कारवाई करीत भारतात जानेवारी महिन्यात तब्बल 29 लाख खाती बंद करून टाकली आहेत. ही माहिती व्हाट्सअपने आपल्या मासिक रिपोर्टमध्ये दिली आहे. व्हाटसअपच्या गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कंपनीने आयटी कायद्याच्या नियम  2021  नूसार ही खाती बंद केली आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 31  जानेवारी दरम्यान तब्बल 29 लाख खात्यांवर संपूर्णपणे प्रतिबंध आणण्यात आला आहे.

व्हाटसअपने आपल्या अहवालात म्हटले आहे की जानेवारी महिन्यात 29,18,000 खाती बंद केली असून त्यात 10,38,000 लाख अशी खाती आहेत, ज्यांना सावधानता म्हणून बंद करण्यात आले आहे. आमचा मॅसेजिंग प्लॅटफॉर्म एंड टू एंड एन्क्रिप्टेड मॅसेजिंग सेवेचा दुरूपयोग करणाऱ्या विरोधात कठोर पावले उचलत आहे. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित मंच मिळावा यासाठी आम्ही ही पावले उचलत आहोत. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही अनेक वर्षे आर्टीफिशियल इंटेलिजन्स, लेटेस्ट टेक्नोलॉजीवर लागोपाठ गुंतवणूक करीत आहोत.

आपल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी  वेगवेगळे टूल्स आणि साधनांचा वापर व्हाटसअप करीत आहे. कोणत्याही खात्याचा गैरउपयोग होत असेल तर त्याचा शोध घेण्याचे तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय रजिस्ट्रेशनच्या वेळी, संदेश पाठवताना आणि नकारात्मक प्रतिक्रियेला उत्तर देताना आम्हाला युजरकडून रिपोर्ट मिळत असतो.

WhatsApp ही Facebook च्या मालकीची क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग आणि व्हॉईस ओव्हर IP (VoIP) सेवा आहे. जी वापरकर्त्यांना मजकूर संदेश आणि व्हॉइस संदेश पाठविण्यास, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्यास आणि प्रतिमा, दस्तऐवज, वापरकर्ता स्थाने आणि इतर माध्यम उपलब्ध करुन देते. WhatsApp प्रामुख्याने मोबाइल डिव्हाइसवरून चालते. परंतू, ते डेस्कटॉप संगणकावरून देखील वापरता येते. व्हॉट्सअॅप सेवेसाठी वापरकर्त्याने मोबाइल नंबर प्रदान करणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.