AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज बिल कमी करायचंय? मग बीएलडीसी पंख्याची ‘ही’ माहिती एकदा नक्की वाचा!

उन्हाचा तडाखा वाढत चालला की घरातला गारवा ही गरज बनते, पण त्यासाठी आलेलं भरमसाठ वीज बिल टेन्शन वाढवतं. पारंपरिक पंखे काहीसा दिलासा देतात, पण विजेचा खर्च आणि कमी कार्यक्षमतेमुळे ते परवडत नाहीत. आता जग स्मार्ट होतंय, तर पंखा मागे का राहावा? याच प्रश्नाचं उत्तर आहे BLDC पंखे. बचतीचं समाधान देणारे हे पर्याय का आहेत तुमच्यासाठी बेस्ट एकदा नक्की वाचा

वीज बिल कमी करायचंय? मग बीएलडीसी पंख्याची ‘ही’ माहिती एकदा नक्की वाचा!
BLDC fanImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: May 25, 2025 | 12:41 PM
Share

उन्हाळ्यात पंखा, कूलर किंवा एसीशिवाय राहणं कठीण आहे. पण एसी आणि कूलरचा विजेचा खर्च डोकेदुखी ठरतो. पंखेही बरीच वीज खातात. अशा वेळी बीएलडीसी (ब्रशलेस डायरेक्ट करंट) पंख्यांनी बाजारात खळबळ उडवली आहे. हे पंखे कमी विजेत भरपूर हवा देतात आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी युक्त आहेत. चला, जाणून घेऊया बीएलडीसी पंखे काय आहेत आणि ते का खास आहेत.

बीएलडीसी पंखे म्हणजे काय?

बीएलडीसी म्हणजे ब्रशलेस डायरेक्ट करंट पंखे. नावावरून कळतं, यात पारंपरिक पंख्यांसारखे ब्रश नसतात. यांची मोटर इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरने चालते. यात डीसी मोटरचा वापर होतो, ज्यामुळे बिजलीचा वापर कमी होतो. पारंपरिक पंख्यांत एसी मोटर असते, जी जास्त वीज खाते. बीएलडीसी पंख्यांची मोटर टिकाऊ असते. हे पंखे वर्षानुवर्षे खराब न होता चालतात. यात कायमस्वरूपी चुंबक वापरले जातात, जे घर्षण आणि उष्णता कमी करतात. परिणामी, मोटरचं आयुष्य वाढतं आणि देखभाल खर्च कमी होतो.

वीजेची बचत कशी होते ?

बीएलडीसी पंखे वीज बचतीत अव्वल आहेत. सामान्य पंखा 50 ते 100 वॅट बिजली खतो, तर बीएलडीसी पंखा फक्त 24 ते 35 वॅट वापरतो. एका युनिट विजेत सामान्य पंखा 6.5 ते 10 तास चालतो. पण बीएलडीसी पंखा तब्बल 25 ते 28 तास चालतो. म्हणजे विजेचा वापर जवळपास तिप्पट कमी! समजा, तुम्ही दिवसाला 8 तास पंखा चालवता आणि विजेचा दर युनिट 7 रुपये आहे. सामान्य पंखा वर्षाला सुमारे 233.6 युनिट्स (80 वॅट * 8 तास * 365) खतो, म्हणजे 1635 रुपये. पण बीएलडीसी पंखा फक्त 87.6 युनिट्स (30 वॅट * 8 तास * 365) खतो, म्हणजे 613 रुपये. यातून वर्षाला सुमारे 1000 ते 1500 रुपयांची बचत होते.

बीएलडीसी पंख्याचे स्मार्ट वैशिष्ट्यं काय आहेत ?

बीएलडीसी पंखे फक्त वीज वाचवत नाहीत, तर आरामदायी अनुभव देतात. यात घर्षण नसल्याने आवाज जवळपास नसतो. सामान्य पंख्यांचा आवाज (40-50 डेसिबल) त्रासदायक ठरू शकतो, पण बीएलडीसी पंख्यांचा आवाज फक्त 32 डेसिबल आहे. हे पंखे रिमोट कंट्रोलने चालतात, ज्यामुळे स्पीड, टायमर आणि लाइट्स नियंत्रित करणं सोपं आहे. काही पंखे स्मार्ट होम सिस्टीमशी जोडता येतात. तुम्ही अ‍ॅलेक्सा किंवा मोबाइल अ‍ॅपने पंखा चालू-बंद करू शकता. याशिवाय, हे पंखे इन्व्हर्टरवर जास्त वेळ चालतात, कारण विजेचा वापर कमी आहे. काही मॉडेल्स शेवटची स्पीड किंवा लाइट सेटिंग लक्षात ठेवतात, ज्यामुळे पुढच्या वेळी तेच सेटिंग आपोआप लागतं.

बीएलडीसी विरुद्ध सामान्य पंख्याची तुलना

वीजेची खपत: बीएलडीसी – 28-35 वॅट vs सामान्य – 50-100 वॅट

आयुष्य: बीएलडीसी – 7-10 वर्षे vs सामान्य – 5-6 वर्षे

आवाज: बीएलडीसी – कमी (32 डेसिबल) vs सामान्य – मध्यम ते जास्त

इन्व्हर्टर : बीएलडीसी – होय vs सामान्य – नाही

स्मार्ट वैशिष्ट्यं: बीएलडीसी – उपलब्ध vs सामान्य – नाही

किंमत: बीएलडीसी – 3000-7000 रुपये vs सामान्य – 1200-1800 रुपये

कोणता पंखा निवडाल?

बीएलडीसी पंखे ऊर्जा बचत, टिकाऊपणा आणि स्मार्ट वैशिष्ट्यांमुळे पुढे आहेत. सामान्य पंखे स्वस्त असले, तरी दीर्घकालीन खर्च आणि पर्यावरणाचा विचार करता बीएलडीसी पंखे फायदेशीर आहेत. तुम्हाला स्मार्ट, शांत आणि वीज वाचवणारा पंखा हवा असेल, तर बीएलडीसी हा उत्तम पर्याय आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.