लग्नात DSLR नाही? टेन्शन नॉट, स्मार्टफोनने “या” टीप्स वापरा आणि काढा जबरदस्त फोटो!
स्मार्टफोन तंत्रज्ञानाने फोटोग्राफीला खूपच सोयीस्कर बनवले आहे, आणि 2025 मध्ये स्मार्टफोन कॅमेऱ्यांची क्षमता आणखी वाढली आहे. iPhone 13, Google Pixel 8 किंवा Samsung Galaxy S23 सारखे फोन उत्कृष्ट कॅमेरा पर्याय देतात. तरीही, केवळ चांगल्या फोननेच प्रोफेशनल फोटोज मिळणार नाहीत.

लग्नसराई म्हणजे आनंद, उत्सव आणि आठवणी जपणारे फोटो. DSLR कॅमेरा नसेल, तरी चिंता नाही – स्मार्टफोननेही तुम्ही प्रोफेशनल फोटो काढू शकता, फक्त योग्य ट्रिक्स माहिती असल्या पाहिजेत. इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर खास 5 टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्या तुमचे फोटो DSLR सारखे काढतील.
1. प्रकाशावर नियंत्रण ठेवा : प्रकाश हा फोटोग्राफीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नैसर्गिक प्रकाशात म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी फोटो अधिक सुंदर दिसतात. घरातल्या लग्नात खिडकीजवळ किंवा सौम्य प्रकाशात फोटो घ्या. रात्रीच्या वेळी रिंग लाइट किंवा पोर्टेबल LED लाइट वापरा. फ्लॅश वापरणे टाळा, कारण त्यामुळे फोटो कृत्रिम वाटतात.
2. फ्रेमिंग योग्य ठेवा : फोटो काढताना पार्श्वभूमीकडेही लक्ष द्या. सजावट, फुले, दिवे अशा घटकांचा वापर करून फ्रेम आकर्षक बनवा. सब्जेक्टला फ्रेममध्ये व्यवस्थित मांडण्यासाठी ‘Rule of Thirds’ वापरा – म्हणजेच सब्जेक्ट थेट मध्यभागी न ठेवता थोडा साईडला ठेवा. यामुळे फोटो अधिक नैसर्गिक आणि प्रोफेशनल दिसतो.
3. पोर्ट्रेट मोडचा योग्य वापर करा : स्मार्टफोनमधील पोर्ट्रेट मोडमुळे सब्जेक्ट ठळक आणि पार्श्वभूमी ब्लर होते. यामुळे DSLR सारखा बोकेह इफेक्ट मिळतो. नवरा-नवरीच्या पोर्ट्रेट शॉटसाठी योग्य अँगल ठेवा आणि 3-4 फूट अंतरावरून फोटो घ्या. काही फोनमध्ये लाइटिंग इफेक्ट्सही असतात – त्यांचा वापर करून फोटो अधिक उठावदार करा.
4. क्लोज-अप शॉट्सना द्या महत्त्व : दागिने, मेहंदी, कपड्यांवरील डिझाईन्स अशा छोट्या गोष्टी फोटोंना खास बनवतात. मॅक्रो मोड असलेल्या स्मार्टफोनचा वापर करून हे डिटेल्स स्पष्ट टिपा. हात स्थिर ठेवा किंवा ट्रायपॉड वापरा – यामुळे फोटो ब्लर होणार नाहीत आणि डिटेलिंग स्पष्ट राहील.
5. कॅंडिड क्षण पकडा : कधी कधी सर्वात सुंदर फोटो तेच असतात जे प्लॅन नसतात. हसणं, बोलणं, अचानकचे इमोशनल मोमेंट्स – हे क्षण जास्त प्रभावी असतात. बर्स्ट मोड वापरा, म्हणजे एकाच वेळी अनेक फोटो काढता येतील आणि त्यातून बेस्ट शॉट निवडता येईल.
