AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Simcard पोस्टपेडवरून प्रीपेड किंवा त्या उलट स्विच करण्याच्या नियमात बदल, वापरकर्त्यांना मिळणार असा दिलासा

भारतीय दूरसंचार विभागाने सिमकार्ड नियमात बदल केला आहे. यामुळे प्रीपेड कार्डवरून पोस्टपेड आणि पोस्टपेड कार्डवरून प्रीपेडमध्ये स्विच करणं आता सोपं झालं आहे. यामुळे वापरकर्त्यांच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होणार आहे. नेमका काय बदल केला ते जाणून घ्या.

Simcard पोस्टपेडवरून प्रीपेड किंवा त्या उलट स्विच करण्याच्या नियमात बदल, वापरकर्त्यांना मिळणार असा दिलासा
मोबाईल सिमकार्डImage Credit source: Freepik
Updated on: Jun 13, 2025 | 4:36 PM
Share

मोबाईल ही आता माणसाची गरज झाली आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल पाहायला मिळतो. क्वचितच काही जण मोबाईलपासून दूर राहात असतील. पण जवळपास सर्वांच्या मोबाईल दिसतो. पण पोस्टपेड वापरणाऱ्या ग्राहकांची चिंता काही वेगळीच असते. कारण कधी कधी आवाक्याबाहेर बिल आलं की घाम फुटतो. दुसरीकडे, प्रीपेड कार्ड वापरणाऱ्यांचा रिचार्ज मोक्याच्या क्षणी संपल्याने फजिती होते. तसेच महत्त्वाचं काम रखडल्याने चिडचिड होते. त्यामुळे अनेक जण स्विच करण्यासाठी धडपड करतात. पण त्याचा अवधीही जास्त असल्याने टेन्शन वाढतं. पण आता दूरसंचार विभागाने वापरकर्त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सिमकार्ड नियमात बदल केला आहे. यामुळे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड स्विच करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. कारण दूरसंचार विभागाने स्विच करण्याचा कूलिंग पीरियड कमी केला आहे. यापूर्वी वापरकर्ते 90 दिवसाआधी स्विच करू शकत नव्हते. मात्र आता हा अवधी 30 दिवसांचा केला आहे.

नव्या नियमामुळे 30 दिवसानंतर तुम्ही आरामात प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड करू शकतो. पण त्यानंतर स्विच करण्यासाठी 90 दिवसांचा अवधी लागेल. म्हणजेच पहिल्यांदा स्विच करताना 30 दिवसांचा अवधी लागेल. पण वारंवार स्विच करणाऱ्यांसाठी हा अवधी 90 दिवसांचा असेल. दूरसंचार विभागाने ओटीपीच्या माध्यमातून प्रीपेडवरून पोस्टपेड आणि पोस्टपेडवरून प्रीपेड करता येईल. यामुळे वारंवार स्विच करणाऱ्या वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.

स्विच करण्याचं कारण काय?

प्रीपेडवरून पोस्टपेड आणि पोस्टपेडवरून प्रीपेड करण्याची अनेक कारणं आहेत. कधी कधी प्लान महाग असला किंवा सर्व्हिस मनासारखी नसेल तर स्विच करण्याची तयारी होते. जर तुम्ही आज म्हणजे 13 जूनला प्रीपेड नंबर घेतला आणि काही दिवस वापरल्यानंतर पोस्टपेडमध्ये स्विच करू इच्छित असाल तर 30 दिवसात स्विच करू शकता. यासाठी तुम्हाला 90 दिवस थांबण्याची गरज नाही. या लॉक इन पीरियडमध्ये पुन्हा स्विच करायचं असेल तर करू शकता. पण यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत आउटलेटमध्ये जाऊन केव्हायसी पूर्ण करावी लागेल.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.