AC आणि कूलरला विसरा, कमी खर्चात दुप्पट हवा देणारं ‘हे’ डिव्हाईस आणा घरी
उन्हाळ्यातील असह्य उकाड्यात एसी आणि कूलरचा वापर सर्वसामान्य झाला असला, तरी त्याचा खर्चही तितकाच जास्त असतो. मात्र आता कमी खर्चात दुप्पट थंडावा देणारं नवं डिव्हाइस बाजारात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हवेत दमटपणा प्रचंड वाढला आहे. पावसामुळे वातावरणात निर्माण झालेली ही उष्ण आणि दमट हवा अनेकांच्या त्रासाचे कारण बनली आहे. विशेष म्हणजे अशा हवामानात एअर कंडिशनर आणि कूलर सुद्धा प्रभावी राहत नाहीत. यामुळे अनेक लोकांना सतत घाम येतो, थकवा जाणवतो आणि अस्वस्थता वाढते. पण यावर उपाय म्हणून एक खास डिव्हाईस सध्या चर्चेत आहे तो म्हणजे डीह्यूमिडिफायर.
डीह्यूमिडिफायर हे उपकरण विशेषतः हवेत असलेल्या अतिरिक्त आर्द्रतेला कमी करण्यासाठी वापरलं जातं. पावसाळ्यात ज्या काळात हवेमध्ये नमीचे प्रमाण अत्यंत वाढते, त्या वेळी ही यंत्रणा मोठा दिलासा देते. हवेतून ओलावा शोषून घेऊन ही यंत्रणा हवेला कोरडी करते व त्यामुळे शरीराला थंडावा आणि आराम मिळतो. यामुळे पंखा, कूलर किंवा AC जरी चालू असले तरीही त्यांचा प्रभाव वाढतो.
सामान्यपणे AC आणि कूलर हे फक्त तापमान कमी करण्याचं काम करतात, पण दमट हवेमुळे त्यांचं कार्यक्षमता मर्यादित होते. याउलट डीह्यूमिडिफायर केवळ तापमानावर नाही तर हवेमधील ओलाव्यावरदेखील नियंत्रण ठेवतो. यामुळे शरीराला अस्वस्थ करणारा चिकटपणा कमी होतो आणि थंडावा जाणवतो. विशेष म्हणजे, पावसाळ्यात खूप वेळा घरामध्ये भिंती ओलसर होतात, फर्निचरवर बुरशी येते आणि कपड्यांमध्येही वास येतो, पण डीह्यूमिडिफायर या सगळ्यावर नियंत्रण ठेवतो.
डीह्यूमिडिफायर वापरण्याचे आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची स्वच्छतेसाठी मदत करणारी भूमिका. यामुळे घरातील धूळ, बुरशीचे कण आणि हवेत असलेले घातक बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक व दमा-ऍलर्जी असणाऱ्यांसाठी हा डिव्हाईस फायदेशीर ठरतो. शिवाय यामुळे घरातील हवेमध्ये सतत शुद्धता राहते आणि दमटपणामुळे होणारे आजार टळतात.
सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून या डिव्हाईसचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खर्च कमी होणे. एअर कंडिशनरच्या तुलनेत डीह्यूमिडिफायर हे 4 ते 5 पट स्वस्त असतात. याला कमी वीज लागते आणि दीर्घकालीन वापरासाठी देखील परवडणारे ठरतात. शिवाय यासाठी मोठी मर्मत देखील लागत नाही, त्यामुळे देखभाल खर्चही फारसा नसतो.
सध्या हवामानातील बदल आणि वाढणारी दमटता पाहता डीह्यूमिडिफायरचा वापर हा केवळ आलिशान जीवनशैलीचा भाग राहिलेला नाही, तर आरोग्यासाठी आवश्यक उपकरण म्हणून पुढे येत आहे. विशेषतः पावसाळी काळात जिथे दमट हवेमुळे त्रास होतो तिथे हा डिव्हाईस एअर कंडिशनर किंवा कूलरपेक्षा अधिक प्रभावी आणि किफायतशीर पर्याय ठरतो. त्यामुळे दमट हवेत असह्य उकाडा सहन करण्यापेक्षा डीह्यूमिडिफायर वापरून आरामदायक आणि निरोगी वातावरणात राहण्याचा पर्याय आता लोकांच्या पसंतीस उतरतो आहे.
