ChatGPT सोबत कधीही शेअर करू नका या पाच महत्वाच्या गोष्टी, अन्यथा…
जर तुम्ही प्रत्येक काम लवकर करण्यासाठी ChatGPT वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. ChatGPT वर जास्त विश्वास ठेवल्याने तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगत आहोत, ज्या चुकूनही ChatGPT किंवा इतर AI चॅटबॉट्ससोबत शेअर करू नयेत.

प्रगत तंत्रज्ञानाच्या या युगात, OpenAI च्या ChatGPT सारखे चॅटबॉट्स आपल्या दैनंदिन जीवनात वाढत्या प्रमाणात प्रचलित झाले आहेत. तसेच वाढत्या क्रेझनुसार यांचा वापर वाढत चालेला आहे. डिजिटलच्या माध्यमातुन माहिती शेअर केल्याने आजकाल अनेक सायबर क्राईमच्या घटना समोर येत आहे,ज्यामुळे याला बळी पडलेल्या सामान्य लोकांना आता पश्चाताप होत आहे. अशातच जर तुम्ही प्रत्येक काम लवकर करण्यासाठी ChatGPT वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण ChatGPT वर जास्त विश्वास ठेवणे तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकते. तुम्हाला ChatGPT सारखे चॅटबॉट्स उपयुक्त आणि विश्वासार्ह सहाय्यक वाटत असले तरी तज्ञांनी सल्ला दिला आहे की काही गोष्टी ChatGPT ला न सांगणे चांगले. विशेषतः सेंसिटिव्ह माहिती जसे की बँकिंग तपशील, पासवर्ड, आरोग्य सल्ला इत्यादी. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगत आहोत, ज्या चुकूनही ChatGPT किंवा इतर AI चॅटबॉट्ससोबत शेअर करू नयेत.
1. वैयक्तिक माहिती
तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर किंवा ईमेल पत्ता यासारखी तुमची वैयक्तिक माहिती कधीही AI चॅटबॉट्ससोबत शेअर करू नका. ही माहिती तुम्हाला ओळखण्यासाठी आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेण्यासाठी वापरली जाऊ शकते.
2. बँकिंग तपशील
तुमचे बँक खाते क्रमांक, क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा सामाजिक सुरक्षा क्रमांक यासारखे तुमचे आर्थिक तपशील कधीही कोणत्याही एआय चॅटबॉट्ससोबत शेअर करू नका. ही माहिती तुमचे पैसे किंवा तुमची ओळख चोरण्यासाठी वापरली जाऊ शकते.
3. लॉग-इन क्रेडेन्शियल्स
तुमचे पासवर्ड आणि लॉग-इन क्रेडेन्शियल्स कधीही कोणत्याही एआय चॅटबॉट्ससोबत शेअर करू नका. ही माहिती तुमच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि तुमचा डेटा चोरण्यासाठी वापरली जाऊ शकते.
4. कंपनीची गोपनीय माहिती
जर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामासाठी चॅटबॉट्स वापरत असाल तर क्लायंटची माहिती किंवा कंपनीची गोपनीय माहिती शेअर करणे टाळा.2023 मध्ये एक संवेदनशील कोड लीक झाल्यानंतर सॅमसंगने ऑफिसमध्ये एआय चॅटबॉट्सच्या वापरावर बंदी घातली.
5. तुमची वैद्यकीय माहिती
एआय हा तुमचा डॉक्टर नाही, म्हणून कधीही एआयला आरोग्य सल्ला विचारू नका. तसेच, विमा क्रमांक इत्यादींसह तुमचे आरोग्य तपशील कधीही शेअर करू नका.
सुरक्षित राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
तुमचा चॅट इतिहास नियमितपणे डिलिट करा आणि नेहमी ChatGTP मध्ये तात्पुरते चॅटबॉट्स वापरा जेणेकरून तुमचा डेटा मॉडेल प्रशिक्षणासाठी वापरला जाणार नाही. लक्षात ठेवा की तुम्ही AI चॅटबॉट्सना जे काही सांगता ते संग्रहित केले जाऊ शकते आणि संभाव्यतः इतरांसोबत शेअर केले जाऊ शकते. तुम्ही AI चॅटबॉट्सना कधीही असे काहीही सांगू नये जे तुम्ही जगाला सांगू इच्छित नाही. ते कोणतेही गुपित असू शकते जे तुम्ही लपवू इच्छिता.
