AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ChatGPT आणि DeepSeek विषयी केंद्र सरकारचा कर्मचार्‍यांना अलर्ट, काय दिले फर्मान?

ChatGPT-DeepSeek : AI ॲपमुळे माहिती झटपट मिळण्यास मदत होते. अनेक प्रोजेक्ट करण्यासाठी कर्मचारी आता बिनधास्तपणे एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यासाठी ChatGPT-DeepSeek चा वापर वाढला आहे.

ChatGPT आणि DeepSeek विषयी केंद्र सरकारचा कर्मचार्‍यांना अलर्ट, काय दिले फर्मान?
एआय ॲप
| Updated on: Feb 05, 2025 | 11:06 AM
Share

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मुक्त वापर होत आहे. शाळा-महाविद्यालयातील तरुणांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत त्याचा वापर वाढला आहे. अनेक प्रकल्पासाठी एआय ॲपचा वापर वाढला आहे. ChatGPT-DeepSeek प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. पण मोदी सरकारने एआयचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाने सरकारी कार्यालयातील लॅपटॉप, पीसी अथवा शासकीय इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये कोणत्याही एआय ॲपचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गोपनिय माहिती आणि डाटा चोरीचा धोका असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.

परदेशी AI Apps चा वापर धोकादायक

सध्या भारतात ChatGPT, Deepseek आणि Google Gemini ही परदेशी AI Apps चा वापर होतो. तर इतर पण अनेक AI Apps आहेत. काम सोपे होण्यासाठी त्यांचा वापर होतो. वेळेची बचत होते आणि झटपट काम होते, म्हणून त्यांचा सर्रास वापर होत आहे. पण हे एआय ॲप पहिल्यांदा वापर करताना डेटा परवानगी घेतात. त्यांना सर्व ॲसेस मिळाल्यावर संबंधित लॅपटॉप, पीसी, मोबाईलची हेरगिरी होण्याची भीती असते. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

एआय ॲप्स आणि एआय चॅटबोटच्या मदतीने अनेक लोक प्रोम्प्ट देऊन पत्र, लेख तयार करणे अथवा भाषांतर करतात. तर अनेक सरकारी कर्मचारी या एआय ॲपच्या मदतीने सादरीकरण, प्रेझेंटेशन करतात. त्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. केवळ एक टेक्स्ट प्रोम्ट करून हे काम करता येते.

Deepseek ठरले लोकप्रिय

चीनचे स्मार्टॲप डीपसीक सध्या लोकप्रिय ठरले आहे. या स्टार्टअपने किफायतशीर दरात सेवा उपलब्ध करुन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चीनचे हे स्टार्ट ॲप जवळपास 20 महिने अगोदर सुरू झाले होते. 20 जानेवारी 2025 रोजी डीपसीक आर1चॅटबोटच्या वापरात अचानक तेजी आली. त्याने अनेक AI कंपन्यांची झोप उडवली आहे. अमेरिकेत डीपसीकविरोधात लवकरच मोठी कारवाई पाहायला मिळाल्यास वावगे ठरू नये. भारत पण लवकरच स्वतःचे  एआय ॲप येणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.