Gmailची ‘ही’ पाच वैशिष्ट्ये तुम्हाला माहीत आहेत का? नसतील तर आजच वाचा!
Gmail केवळ ईमेल पाठवण्यासाठीच नाही, तर स्मार्टपणे वेळ आणि काम सांभाळण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. मग 'या' पाच वैशिष्ट्यांचा उपयोग केल्यास तुम्ही तुमचं Gmail अधिक सोप्प्या व सुरक्षित पद्धतीने वापरू शकता.

आजच्या डिजिटल युगात ईमेल ही केवळ एक संवादाची साधन नसून, कामाच्या, शिक्षणाच्या, बँकिंगच्या आणि अगदी वैयक्तिक जीवनातील एक अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. Gmail हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे ईमेल प्लॅटफॉर्म आहे. पण आजही बरेच वापरकर्ते फक्त मेल पाठवणे आणि प्राप्त करणे या पातळीपर्यंतच Gmail वापरतात. प्रत्यक्षात Gmail मध्ये अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये (features) आहेत जी आपला वेळ, मेहनत आणि डेटा यांची बचत करतात.
चला तर मग जाणून घेऊया Gmail मधील ‘ही’ पाच विशेष वैशिष्ट्ये, जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल!
1. Schedule Send : बरेचदा आपल्याला रात्री मेल तयार करायचा असतो, पण पाठवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी. Gmail चे ‘Schedule Send’ हे वैशिष्ट्य यासाठीच आहे. तुम्ही मेल लिहून ठेवू शकता आणि तो कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेला पाठवायचा ते ठरवू शकता.
कसं वापरायचं?
मेल लिहिल्यानंतर ‘Send’ च्या बाजूला असलेल्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून ‘Schedule send’ वर क्लिक करा आणि वेळ निवडा.
2. Undo Send : कधी मेल पाठवून लक्षात येतं की एखादी चूक झाली आहे, किंवा चुकीच्या व्यक्तीला पाठवला गेला आहे? Gmail चं ‘Undo Send’ हे वैशिष्ट्य तुम्हाला त्या मेलला काही सेकंदांत थांबवण्याची संधी देतं.
कसं वापरायचं?
मेल पाठवल्यानंतर स्क्रीनवर “Undo” असा पर्याय काही सेकंदासाठी दिसतो. त्या वेळेत तुम्ही क्लिक केल्यास मेल पाठवला जात नाही.
3. Confidential Mode : जर तुम्ही गोपनीय माहिती पाठवत असाल, तर Gmail चा ‘Confidential Mode’ फार उपयुक्त आहे. यामध्ये तुम्ही मेलचा expiry time सेट करू शकता, पासकोड लावू शकता आणि रिसीव्हरना मेल फॉरवर्ड, डाउनलोड, किंवा कॉपी करता येत नाही.
कसं वापरायचं?
मेल लिहिताना खाली असलेल्या लॉक व घड्याळाच्या चिन्हावर क्लिक करा आणि Confidential Mode सुरू करा.
4. Smart Compose : Gmail मध्ये AI आधारित ‘Smart Compose’ फिचर आहे, जे तुम्ही मेल टाईप करताना पुढचे वाक्य सुचवते. त्यामुळे टायपिंगचा वेळ वाचतो आणि व्याकरणाच्या चुका टाळता येतात.
कसं सुरू करायचं?
Settings > See all settings > General मध्ये जाऊन ‘Smart Compose’ ऑन करा.
5. Labels आणि Filters : दररोज हजारो मेल्स येतात तेव्हा महत्त्वाचे मेल शोधणं अवघड होतं. Gmail चे ‘Labels’ आणि ‘Filters’ फिचर्स यासाठीच आहेत. तुम्ही नियमांनुसार मेल्सना रंग, फोल्डर किंवा लेबल्स लावू शकता. उदा. बँकिंग, ऑफिस, फॅमिली वगैरे.
कसं वापरायचं?
मेल निवडा > More > Label किंवा Filter पर्याय निवडा.
