AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Pixel 6a ची किंमत समजली का?… ‘या’ दिवसापासून प्री-बुकिंगला सुरुवात

गुगलने नुकतील केलेल्या एका घोषणेनुसार, Pixel 6a अमेरिका आणि जपानमध्ये 21 जुलैपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

Google Pixel 6a ची किंमत समजली का?... ‘या’ दिवसापासून प्री-बुकिंगला सुरुवात
Google Pixel 6aImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 11:47 AM
Share

गुगल पिक्सेल 6ए (google pixel 6a) ची घोषणा Goole I/O इव्हेंट 2022 दरम्यान करण्यात आली होती. युएसमध्ये या स्मार्टफोनची घोषणा 449 डॉलरमध्ये करण्यात आली होती, ती भारतीय चलनात जवळपास 34 हजार 791 रुपये इतकी होती. आता गुगल पिक्सेल 6ए फोनची किंमत युके, कॅनडा, आस्ट्रेलिया, फ्रांसमध्ये स्पष्ट झालेली आहे. परंतु भारतात याची किंमत (price) असजूनही स्पष्टपणे समोर आलेली नाही. चर्चेवर विश्‍वास ठेवला तर, हा स्मार्टफोन जुलैच्या शेवटापर्यंत भारतील बाजारपेठेत दाखल होउ शकतो. गुगलने घोषणा केली आहे, की पिक्सेल 6ए अमेरिका आणि जपानमध्ये 21 जुलैपासून प्री-बुकिंगसाठी (Pre-booking) उपलब्ध होणार आहे. GSMArena नुसार, कॅनडामध्ये गुगल पिक्सेल 6ए ची किंमत CAD 599 ठेवण्यात आलेली आहे.

कुठे किती किंमत

युकेमध्ये या डिवाइसची किंमत सिंगल 6GB व्हेरिएंटसाठी 459 पाउंड आहे. आयरलँड, जर्मनी, फ्रांस, इटली, स्पेनमध्ये याची किंमत 459 युरो आहे. एका रिपोर्टनुसार, पिक्सेल 6ए चा चारकोल व्हेरिएंट सिंगापूर आणि आयरलँडमध्ये उपलब्ध असणार आहे. दुसर्या सर्व क्षेत्रांमध्ये सेज आणि चाकचे पर्यायदेखील उपलब्ध होणार आहेत. पिक्सेल 6ए आणि पिक्सेल 6 चा ट्रिम डाउन व्हर्जन आहे. ज्याला मागील वर्षी लाँच करण्यात आले होते.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

या नवीन स्मार्टफोनची डिझाईन पिक्सेल 6ए सारखी आहे. फोनमध्ये पिक्सेल 6 सारखा कॅमेरा देण्यात आला आहे. याला चाक, चारकोल आणि सेजसह तीन कलर ऑप्शन देण्यात आलेले आहेत. याला गुगलच्या प्रीमियम फोन पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो सोबत 449 डॉलरच्या कमी किमतीत ठेवण्यात आलेले आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये Google Tensor चिपसेट देण्यात आलेला आहे. सोबतच पावरफूल कॅमेराही उपलब्ध असणार आहे. पिक्सेलमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे ज्यात, एक मेन लेंस आणि एक अल्ट्रावाइड लेंस देण्यात आलेली आहे. पिक्सेल 6ए ला सेल्फी कॅमेरासाठी पिक्सेल 6 सारखा दमदार कॅमेरा देण्यात आलेला आहे. पिक्सेल 6ए अपकमिंग Android 13 अपडेट मिळविणार्या पहिल्या Android डिव्हाईसमधील एक असेल. फोनमध्ये 6.1 इंचाचा डिसप्ले देण्यात आलेला आहे. सोबतच गुगल टेंसर चिपसेटदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. कॅमेरा फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यात 12 एमपीचा मेन कॅमेरा देण्यात आलेला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 एमपी कॅमेरा देण्यात आलेला आहे. चार्जिंगसाठी यात, 4410mAh बेटरी आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आलेला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.