AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 मध्ये IPLपासून ते महाकुंभापर्यंत भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या ‘या’ गोष्टी

दरवर्षी, गुगल आपल्या सर्च इंजिनवर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या कीवर्ड्सची यादी प्रसिद्ध करते. आता गुगलच्या इयर इन सर्चची 2025 ॲडिशन प्रसिद्ध झाली आहे. चला टॉप सर्च रिझल्ट्सबद्दल आणि भारतातील लोकांनी सर्वात जास्त काय सर्च केले ते जाणून घेऊयात...

2025 मध्ये IPLपासून ते महाकुंभापर्यंत भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या 'या' गोष्टी
google-trendImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Dec 08, 2025 | 10:58 AM
Share

सर्च इंजिन गुगलवर आपण अनेक गोष्टी सर्च करत त्याबद्दल माहिती मिळवत असतो. अशातच वर्षाभरात भारतीयांनी सर्वात जास्त काय सर्च केल हे गुगल आपल्याला वर्षाच्या शेवटी सांगत असतं. तर गुगलने क्रिकेट मॅचेस,स्पोर्टस इवेंट, टॉप साँग, चित्रपट, शो, भारतीय व्यक्ती, शब्दांचे किंवा वाक्यांचे अर्थ, निअर मी, पर्यटनाची ठिकाणी, रेसिपी यासारख्या कॅटेगरीत कोणत्या गोष्टी सर्च केल्या गेल्या याची माहिती देत असतो. तर यंदा दरवर्षीप्रमाणे गुगलने भारतासाठी त्यांचा ‘Year in Search’ हा लेख प्रसिद्ध केला आहे. ‘इयर इन सर्च’ चा 2025 हे ॲडिशन आले आहे ज्यामध्ये ट्रेंडिंग, ओव्हरऑल एआय आणि इतर श्रेणींमध्ये टॉप ट्रेंडिंग सर्च दाखवतो. गुगलने ट्रेंडिंग सर्चचा “ए ते झेड” देखील सादर केला आहे, ज्यामध्ये अल्फाबेट यातील प्रत्येक अक्षर वेगळ्या लोकप्रिय क्वेरीचे प्रतिनिधित्व करते. आमच्याकडे तुमच्यासाठी सर्व तपशील आहेत; चला जाणून घेऊया.

Google Year in Search 2025: 2025 मध्ये भारतात सर्वाधिक ट्रेंडिंग सर्च कोणते होते?

-आयपीएल

-गुगल जेमिनी

-आशिया कप

-आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी

-प्रो कबड्डी लीग

-महाकुंभ

-महिला विश्वचषक

-ग्रोक

-सैयारा

-धर्मेंद्र

गुगलने सांगितले आहे की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हा शब्द भारतात सर्वाधिक शोधला गेला. गुगलवर जेमिनी दुसऱ्या क्रमांकावर, त्यानंतर आशिया कप तिसऱ्या क्रमांकावर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी चौथ्या क्रमांकावर, प्रो कबड्डी लीग पाचव्या क्रमांकावर, महाकुंभ सहाव्या क्रमांकावर, महिला विश्वचषक सातव्या क्रमांकावर, GROK आठव्या क्रमांकावर, सैयारा नवव्या क्रमांकावर आणि धर्मेंद्र दहाव्या क्रमांकावर आहे.

एआय कॅटेगिरीमध्ये गुगल जेमिनी सर्वात लोकप्रिय आहे

गुगलने एआयशी संबंधित टॉप ट्रेंडिंग सर्च देखील जारी केले. गुगल जेमिनी अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर Gemini AI Photo दुसऱ्या स्थानावर, GROK तिसऱ्या स्थानावर, DeepSeek चौथ्या स्थानावर, Perplexity पाचव्या स्थानावर, Google AI Studio सहाव्या स्थानावर, ChatGPT सातव्या स्थानावर,ChatGPT Ghibli Art आठव्या स्थानावर, Flow नवव्या स्थानावर आणि Ghibli Style Image Generator दाहाव्या स्थानावर आहे.

भारतातील टॉप ट्रेंड्सबद्दल बोलायचे झाले तर, जेमिनी ट्रेंड प्रथम, घिबली ट्रेंड दुसऱ्या, थ्रीडी मॉडेल ट्रेंड तिसऱ्या, जेमिनी साडी ट्रेंड चौथ्या आणि अॅक्शन फिगर ट्रेंड पाचव्या स्थानावर आहे.

विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.