Spring Season 2021 : वसंत ऋतुच्या स्वागतासाठी गुगलने बनविले खास डूडल

डूडलमध्ये निसर्गाचा चमकदार निळा, हिरवा, लाल, केशरी, पिवळा आणि गुलाबी रंग जोडला गेला आहे. (Google has created a special doodle to welcome the spring)

  • Updated On - 11:21 pm, Sat, 20 March 21
Spring Season 2021 : वसंत ऋतुच्या स्वागतासाठी गुगलने बनविले खास डूडल
वसंत ऋतुच्या स्वागतासाठी गुगलने बनविले खास डूडल

नवी दिल्ली : तो वसंत ऋतूला सुरुवात झाली आहे. हा ऋतू 20 मार्चपासून 21 जूनपर्यंत असेल. या खास ऋतुचे स्वागत करण्यासाठी अमेरिकन टेक कंपनी गुगलने एक खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये निसर्गाचा चमकदार निळा, हिरवा, लाल, केशरी, पिवळा आणि गुलाबी रंग जोडला गेला आहे. यासह, डूडलमध्ये रंगीबेरंगी फुले आणि एक हेजहॉग म्हणजे जंगली उंदीर दर्शविले गेले आहेत. (Google has created a special doodle to welcome the spring)

वसंत ऋतुबद्दल माहिती

वसंत ऋतू हा हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान येतो. या हंगामात झाडे वाढतात आणि सर्वत्र फुले उमलतात. यावेळी, संपूर्ण जगात दिवस आणि रात्रीचा वेळ समान होते. हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत. वसंत ऋतूमधे झाडाला पालवी फुटते. मात्र, वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू होतो. इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात. वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते. युरोपात मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये वसंत ऋतूचे आगमन होते, तर ऑस्ट्रेलियातील वसंत ऋतू हा सप्टेंबर, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत येतो.

यापूर्वी तयार केले होते हे डूडल

यापूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी गुगलने डूडल बनवले होते. हे डूडल ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशनचा वापर करुन बनविण्यात आले होते. डिजिटल अ‍ॅनिमेटेड ग्राफिकद्वारे रंगांनी भरलेले डूडल सादर केले आहे. या डूडलमध्ये हृदयाची आठ चित्रे होती, जी खूपच सुंदर होती. यासह डूडलवर गूगलही लिहिले होते. या व्यतिरिक्त गुगलनेही आर्ट वर्क सविस्तरपणे दाखवले आहे. यात डूडल कसे बनवले आहे त्याची सर्व माहिती गुगलवर उपलब्ध आहे. डूडल फिल्म निर्माता आणि अ‍ॅनिमेटर ऑलिव्हिया व्हेन यांनी तयार केले आहे.

गुगल डूडलचा इतिहास

गुगल जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगल डूडलची सुरुवात 1998 मध्ये करण्यात आली. यानंतर प्रत्येक इव्हेंटला गुगल डूडल सादर करते. त्याच वेळी गुगलने व्हॅलेंटाईनला पहिल्यांदा 2000 मध्ये डूडल सादर केले होते. तेव्हापासून हा क्रम अखंडित सुरू आहे. आजही गुगलने डूडलच्या माध्यमातून लोकांना आपलेसे केले आहे. आतापर्यंत गुगलने सुट्टी, कार्यक्रम आणि इतिहासावर हजारो डूडल सादर केली आहेत. या क्रमाने आज व्हॅलेंटाईन डूडल सादर करण्यात आला आहे. (Google has created a special doodle to welcome the spring)

इतर बातम्या

भूमिपुत्रांची ताकद ! आधी आवेदन, मग आक्रमक, गावकरी भिडताच केडीएमसीला जाग, रस्त्याचं काम सुरु

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI