AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google | आता गणिताची भीती कशाला? तुमचे होमवर्क गुगलच करणार

Google Photomath app | आता गणिताला घाबरायचं काम नाही. दणकावून अभ्यास करा आणि अडचण आली की हे ॲप वापरा. पण या ॲपवरच विसंबून राहु नका, नाही तर तुम्ही आळशी झालात म्हणून समजा. हे ॲप झटपट गणित सोडवेल. फोनच्या केवळ कॅमेऱ्याने तुमचे कठिण गणित चुटकीत सोडवलेच म्हणून समजा.

Google | आता गणिताची भीती कशाला? तुमचे होमवर्क गुगलच करणार
| Updated on: Mar 03, 2024 | 3:58 PM
Share

नवी दिल्ली | 3 March 2024 : गुगल विद्यार्थ्यांसाठी कमालीचे ॲप घेऊन आले आहे. या ॲपचे नाव Photomath असं आहे. हे ॲप झटपट गणित सोडविण्यात एकदम माहीर आहे. फोनच्या कॅमेऱ्याआधारे तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीतील गणित अवघ्या काही मिनिटात सोडवू शकता. तुमच्या वहीतील गणितावर मोबाईलचा कॅमेरा सुरु करायचा, त्यानंतर फोटोमॅथ ॲप, एआय डिटेल एक्सप्लेनेशनच्या मदतीने स्क्रीवरील प्रश्नाचे उत्तर देईल. विद्यार्थ्यांसाठी हे ॲप, गृहपाठ करण्यासाठीचा मित्र तर होईलच पण त्यांना शिकण्यासाठी पण मदत करेल. हे केवळ प्रश्नाचं उत्तरच दाखवतं असे नाही तर प्रश्नाचं उत्तर कसं आले, त्यासाठीचे सूत्र पण सांगतं. त्यामुळे होमवर्क करता करता विद्यार्थ्यांचा होमवर्क पण होतो. विशेष म्हणजे हे ॲप ऑफलाईन मोडमध्ये पण काम करते.

असा होतो उपयोग

फोटोमॅथ ॲप बीजगणित, भूमिती, गणनयंत्रासारखं काम करतं. हे तुमच्या भाषेत पण प्रश्नाचं उत्तर देतं. या ॲपवर अनेक भाषा उपलब्ध आहेत. बेसिक ॲप पूर्णपणे मोफत आहे. गुगल लेन्स आणि गुगल सर्च यांचा वापर करुन हे ॲप अपडेट करण्यात येणार आहे. सध्या हे ॲप जगभरातील विद्यार्थ्यांचा खास मित्र ठरला आहे.

10 कोटींवेळा डाऊनलोड

प्ले स्टोअरवर या ॲपला 4.2 रेटिंग मिळाले आहे. आतापर्यंत 10 कोटींहून अधिकवेळा हे ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे. फोटोमॅथच्या अतिरिक्त फीचर्ससाठी सब्सक्रिप्शन्स प्लॅन आहे. त्यासाठी युझर्सला 9.99 डॉलर प्रति महा मोजावे लागतील. तर वार्षिक जवळपास 5,800 रुपये लागतील. हे ॲप वर्ष 2014 मध्ये क्रोएशियात विकसीत करण्यात आले होते. ते 2022 मध्ये गुगलने खरेदी केले होते. ते अँड्रॉईडसह iOS वर उपलब्ध आहे.

असे करा डाऊनलोड

  1. अँड्राईड डिव्हाईस असणारे युझर्स हे ॲप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकतात
  2. फोटोमॅथ ॲप त्यांना प्ले स्टोअरवर सर्च करावे लागेल. हे ॲप डाऊनलोड करा
  3. ॲप उघडा. जे गणित सोडवायचे, त्यावर तुमच्या फोनचा कॅमेरा धरा
  4. तुमचा प्रश्न ॲपच्या मार्क्ड फ्रेमच्या आताच ठेवा
  5. लाल वर्तुळाला खालच्या बाजूला करा
  6. प्रश्नाचे उत्तर टप्प्याटप्प्याने समजून घेण्यासाठी ‘Show Solving Steps’ या पर्यायावर टॅप करा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.