AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ChatGPT च्या वापरामुळे वाढतेय पाण्याचं संकट? वाचा अभ्यासाचा निष्कर्ष

ChatGPTसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर वाढत असताना, त्यामागे होणाऱ्या वीज आणि पाण्याच्या खर्चाबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वापराचा नेमका खर्च किती होतो चला, जाणून घेऊया सविस्तर माहिती.

ChatGPT च्या वापरामुळे वाढतेय पाण्याचं संकट? वाचा अभ्यासाचा निष्कर्ष
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 11:15 PM
Share

आज जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा झपाट्याने वापर वाढत आहे. ChatGPT सारख्या टूल्समुळे काम सोपं झालं असलं तरी त्यामागचं पर्यावरणीय नुकसान अनेकांना ठाऊक नाही. एका अभ्यासानुसार, ChatGPT वापरून फक्त 100 शब्दांचं ईमेल तयार करण्यासाठी सुमारे 519 मिलीलीटर पाणी खर्च होतं म्हणजे जवळपास एक बाटली पाण्यासारखं!

पाण्याचा वापर नक्की कुठे होतो?

आपण AI म्हणजे केवळ इंटरनेट आणि संगणक यंत्रणा समजतो, पण ही यंत्रणा चालवण्यासाठी डेटा सेंटर्स वापरली जातात. या डेटा सेंटर्समध्ये जेव्हा लाखो युजर्सचा डेटा प्रोसेस केला जातो, तेव्हा संगणक खूप गरम होतात. ही यंत्रणा थंड ठेवण्यासाठी वॉटर कूलिंग सिस्टीम वापरली जाते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. विशेषतः जेव्हा हे डेटा सेंटर्स कोरड्या आणि गरम हवामानात असतात, तेव्हा पाण्याची गरज आणखी वाढते.

अमेरिकेतील एक अभ्यास काय सांगतो?

University of California, Riverside आणि Washington Post च्या अहवालानुसार, जर अमेरिकेतील फक्त 10 टक्के कर्मचारी (जवळपास 1.6 कोटी लोक) आठवड्यातून एकदा ChatGPT वापरून 100 शब्दांचं ईमेल लिहित असतील, तर वर्षभरात सुमारे 43.5 कोटी लिटर पाण्याची गरज भासेल. हा पाण्याचा वापर Rhode Island राज्याच्या दीड दिवसाच्या वापराइतका आहे.

AI चा विजेवर परिणाम काय?

फक्त पाण्याच नाही, तर ChatGPT सारखे टूल्स विजेचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. 100 शब्दांचं ईमेल तयार करण्यासाठी 0.14 किलोवॅट तास (kWh) वीज लागते. हे म्हणजे जवळपास 14 LED बल्ब एक तास जळवण्याइतकं. वरील उदाहरणानुसार वर्षभरात 1.21 लाख मेगावॅट तास वीज लागेल, जी Washington D.C. मधील सर्व घरांच्या 20 दिवसांच्या विजेच्या वापराइतकी आहे.

मॉडेल ट्रेनिंगमध्येही लाखो लिटर पाणी खर्च

फक्त वापरच नाही, तर GPT-3 सारख्या AI मॉडेलला ट्रेंड करण्यासाठी 7 लाख लिटर पाणी लागल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

OpenAI ने दिलं उत्तर

OpenAIच्या प्रतिनिधी Kayla Wood यांच्यानुसार, AI प्रणाली अधिक कार्यक्षम आणि कमी संसाधनांमध्ये चालणारी बनवण्यावर कंपनी सातत्यानं काम करत आहे. भविष्यात यामध्ये सकारात्मक बदल घडतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.

AI तंत्रज्ञान हे आपलं भविष्य घडवणारं साधन आहे, पण त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम दुर्लक्ष करता येणार नाही. आपण जितका जास्त AI वापरतो, तितका पाण्याचा आणि विजेचा वापरही वाढतो. म्हणूनच भविष्यात ‘स्मार्ट टेक’ सोबत ‘ग्रीन टेक’ कडेही लक्ष देणं ही काळाची गरज आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.