49 रुपयांहून कमी किंमतीत 3GB डेटा, Jio, Airtel, Vi. BSNL चे 7 स्वस्त आणि ढासू प्लॅन्स

49 रुपयांहून कमी किंमतीत 3GB डेटा, Jio, Airtel, Vi. BSNL चे 7 स्वस्त आणि ढासू प्लॅन्स
Jio, Airtel, Vi, BSNL

आम्ही तुम्हाला अशा काही इंटरनेट डेटा प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 49 रुपयांपेक्षा कमी आहे.

अक्षय चोरगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 20, 2021 | 7:54 AM

मुंबई : बर्‍याच वेळा आपला दैनिक इंटरनेट डेटा खूप लवकर संपतो. अशा परिस्थितीत आपल्याचा एका अशा प्लॅनची आवश्यकता असते ज्यात एका दिवसासाठी डेटा हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 49 रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यात तुम्हाला जास्तीत जास्त डेटादेखील मिळेल. (Jio, Airtel, Vi and BSNL data plans which you can get more benefits in 49 Rs)

सध्या जिओ (Jio), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) सारख्या सर्व कंपन्या असे अनेक प्लॅन्स पुरवतात. ज्यात आपल्याला अधिक वैधतेसह भरपूर डेटा देखील मिळतो. तर मग जाणून घेऊया असे कोणते प्लॅन्स आहेत आणि आपण त्यांचा कसा फायदा घेऊ शकता…

Jio चे प्लॅन्स

रिलायन्स जिओने 50 रुपयांहून कमी किंमतीचे तीन प्लॅन्स ऑफर केले आहेत, ज्यामध्ये पहिला प्लॅन 11 रुपयांचा आहे. यात तुम्हाला 1 जीबी 4G डेटा मिळेल. दुसरा प्लॅन 21 रुपयांचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 2 जीबी 4G डेटा मिळेल. आपण हे दोन्ही प्लॅन्स आपल्या विद्यमान वैधतेसह वापरू शकता. याशिवाय तिसरा प्लॅन जिओफोन ग्राहकांसाठी आहे, ज्याची किंमत 22 रुपये आहे. या योजनेत, आपल्याला 28 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा मिळेल. हा डेटा संपल्यानंतर आपण 64 केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

Vodafone Idea (Vi) चे प्लॅन्स

Vi ने त्यांच्या युजर्ससाठी सर्वात स्वस्त 16 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. ज्यामध्ये 1GB डेटा मिळतो आणि याची वैधता 24 तासांपर्यंत असते. तसेच कंपनीने 48 रुपयांचा अजून एक प्लॅन सादर केला आहे. ज्याची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे आणि यामध्ये युजर्सना 3GB डेटा दिला जात आहे.

BSNL चा 19 रुपयांचा प्लॅन

BSNL कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन 19 रुपयांचा आहे, ज्यामध्ये युजर्सना 2GB डेटा ऑफर करण्यात आला आहे. हा प्लॅन 1 दिवसाच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे.

Airtel चा 48 रुपयांचा प्लॅन

एयरटेलचा सर्वात स्वस्त डेटा प्लॅन 48 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह 3GB डेटा मिळेल. तसेच हा डेटा संपलन्यानंतर तुम्हाला 50 पैसे प्रति MB पैसे द्यावे लागतील. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही 1 जीबी डेटा वापरलात तर तुम्हाला 500 रुपये मोजावे लागतील.

इतर बातम्या

99 रुपयांहून कमी किंमतीत डेटा, कॉलिंग आणि अधिक वैधता, Vi चे शानदार प्लॅन्स सादर

WhatsApp ला टक्कर देणारं Signal अ‍ॅप ‘या’ देशात कायमस्वरुपी बॅन

तुमचं Twitter Account अधिक सुरक्षित होणार, ट्विटरकडून नवं फीचर सादर

(Jio, Airtel, Vi and BSNL data plans which you can get more benefits in 49 Rs)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें