99 रुपयांहून कमी किंमतीत डेटा, कॉलिंग आणि अधिक वैधता, Vi चे शानदार प्लॅन्स सादर

99 रुपयांहून कमी किंमतीत डेटा, कॉलिंग आणि अधिक वैधता, Vi चे शानदार प्लॅन्स सादर
Vi

आज आम्ही तुम्हाला अशा काही Vi प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे प्लॅन्स 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

अक्षय चोरगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 16, 2021 | 7:16 AM

मुंबई : व्होडाफोन आयडिया (Vi) कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच चांगले प्लॅन सादर करत असते. ज्यामध्ये त्यांच्या ग्राहकांना डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ दिला जातो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही Vi प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे प्लॅन्स 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत आणि यामध्ये तुम्हाला बरेच फायदेदेखील मिळतील. (Best Vodafone idea plans under RS 100 in which you can get unlimited data and talktime and free sms)

Vi च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनी 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक अनलिमिटेड, कॉम्बो / वैधता (Combo/validity) आणि डेटा प्लॅन्स ऑफर करते, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग Vi च्या शानदार प्लॅन्सबाबतची माहिती जाणून घेऊया.

Vi चा पहिला प्लॅन 19 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला दोन दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 200MB डेटा मिळेल. याशिवाय दुसरा प्लॅन 99 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 18 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 जीबी डेटा मिळेल. यासह तुम्हाला 100 फ्री एसएमएस पाठवण्याची मुभा आहे.

Combo व्हॅलिडिटी प्लॅन्स

यामधील पहिला प्लॅन 39 रुपयांचा आहे, या प्लॅनची वैधता 14 दिवसांची असून यामध्ये 100MB डेटा आणि 30 रुपये मिळतील. या यादीत 59 रुपयांचा दुसरा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस असून यामध्ये 30 लोकल + नॅशनल + रोमिंग कॉलिंग मिनिट्स मिळतील. 28 दिवसांच्या वैधतेसह कंपनीने 64 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. यामध्ये 52 रुपये आणि 100 एमबी डेटा मिळेल.

कंपनीने 28 दिवसांच्या वैधतेसह 79 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना 64 रुपये आणि 400MB डेटा मिळेल. सोबतच 28 दिवसांच्या वैधतेसह 49 रुपयांचा प्लॅन कंपनीने सादर केला आहे. त्यामध्ये ग्राहकांना 38 रुपये आणि 300MB डेटा दिला जात आहे. तसेच 56 दिवसांच्या वैधतेसह 74 रुपयांचा प्लॅन कंपनीने सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना 74 रुपये आणि 200MB डेटा मिळेल.

डेटा प्लॅन्स

जर तुम्ही डेटा प्लॅन्स शोधत असाल तर कंपनीने तुमच्यासाठी 28 दिवसांच्या वैधतेसह 48 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 3GB डेटा दिला जात आहे. तर 16 रुपयांमध्ये 1GB डेटा दिला जात आहे. तसेच 28 दिवसांच्या वैधतेसह कंपनीने 98 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 12GB डेटा मिळेल. यासह तुम्हाला एसएमएस, आयएसडी पॅक, एंटरटेन्मेंट पॅक इत्यादींसह इतरही अनेक प्रकारच्या योजना मिळतील ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.

संबंधित बातम्या

Jio चा धमाकेदार प्लान! फक्त 3.86 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, वाचा काय आहे ऑफर

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच

(Best Vodafone idea plans under RS 100 in which you can get unlimited data and talktime and free sms)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें