तब्बल 16GB रॅमसह Lenovo नवा स्मार्टफोन लाँच करणार, गेमर्सना दमदार फीचर्स मिळणार

लेनोवो (Lenovo) या वर्षी त्यांच्या लिजन गेमिंग स्मार्टफोनचा सक्सेसर (Lenovo Legion Gaming Smartphone) बाजारात सादर करण्याची योजना आखत आहे.

तब्बल 16GB रॅमसह Lenovo नवा स्मार्टफोन लाँच करणार, गेमर्सना दमदार फीचर्स मिळणार
Lenovo Legion Gaming Smartphone

मुंबई : लेनोवो (Lenovo) कंपनी या वर्षी त्यांच्या लिजन गेमिंग स्मार्टफोनचा सक्सेसर (Lenovo Legion Gaming Smartphone) बाजारात सादर करण्याची योजना आखत आहे. कंपनीने चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबोवरही या डिव्हाइसचा उल्लेख केला आहे. जीएसएमअरेनाच्या अहवालानुसार लेनोवोचे जनरल मॅनेजर चेन जिन यांनी सांगितले की, हा फोन फीचर-पॅक असेल आणि युजर्सना गेमिंगचा चांगला अनुभव मिळवून देताना यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. (Lenovo New Legion Gaming Phone may launch soon with 16 GB RAM)

हँडसेटसाठी स्प्रिंग रिलीज करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या गेमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये 16 जीबी एलपीडीडीआरएस 5 एक्स रॅम देखील असेल. स्मार्टफोनमध्ये खास प्रकारची अॅक्टिव्ह कूलिंग सुविधा देखील असेल, जेणेकरुन कोणताही गेम खेळताना हा फोन गरम होणार नाही. या फोनमध्ये अमोलेड स्क्रीन देखील असेल. फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी असेल आणि त्यामध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टही असेल.

Yoga Slim 7i Pro लाँच

लेनोवोने अलीकडेच आपला नवीन योगा स्लिम 7i प्रो लॅपटॉप लॉन्च केला आहे. इंटेलकोर आय 7 प्रोसेसरसह हा 11 जनरेशन लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा 2.8 के ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचं रिजोल्यूशन 2,880 × 1,800 पिक्सल इतकं आहे. याशिवाय याचा रीफ्रेश रेट 90HZ आणि आस्पेक्ट रेशियो 16:10 इतका आहे. हा डिस्प्ले हाय कलर फ्रिक्वेन्सी आणि ब्लॅक सॅचुरेशन प्रदान करतो.

या लेनोवो लॅपटॉपचा डिस्प्ले सॅमसंगने तयार केला असून कंपनीचा असा दावा आहे की, लॅपटॉपच्या स्क्रीनमुळे ब्लू लाइट 70 टक्क्यांनी कमी झाली आहे आणि हा लॅपटॉप भर उन्हातही वापरता येईल. लेनोवो योगा स्लिम 7 आय प्रो च्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास, यात 11-जनरेशन इंटेल कोर आय 7 प्रोसेसर आहे जो 16 जीबी रॅम आणि 1 टीबी पीसीआय एसएसडी (1TB PCIe SSD) स्टोरेजसह येतो. कंपनी हा लॅपटॉप इंटेल Iris Xe ग्राफिक्स किंवा NVIDIA GeForce MX450 पर्यंतच्या डिस्क्रीट ग्राफिक्स सह सादर करु शकते. ऑडियोसाठी यामध्ये हार्मोन स्पीकर्स आणि डॉल्बी अॅटमॉसचा वापर करण्यात आला आहे. सोबतच यामध्ये दोन यूएसबी कॉम्बो जॅकसुद्धा देण्यात आले आहेत. लॅपटॉपवर अलेक्सा ऑपरेट करण्यासाठी, त्यात इनबिल्ट माईकदेखील देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Moto E7 Power Review : मोटोरोलाचा नवा बजेट फोन भारतात लाँच, जाणून घ्या स्मार्टफोनबाबत सर्व माहिती

OPPO F19 Pro, F19 Pro+5G स्मार्टफोन्सचे फीचर्स लीक, जानून घ्या काय असेल खास

ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री

(Lenovo New Legion Gaming Phone may launch soon with 16 GB RAM)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI