32MP सेल्फी कॅमेरा, 2K डिस्प्लेसह OnePlus 10 Pro लाँच होणार, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?

2021 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 14 दिवसांनी 2022 हे नवीन वर्ष सुरु होईल. या वर्षाच्या पहिल्या तिमाहित अनेक लेटेस्ट स्मार्टफोन लाँच होणार आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वीच पुढच्या वर्षी लॉन्च होणार्‍या डिव्हाइसेसची माहिती समोर येऊ लागली आहे.

32MP सेल्फी कॅमेरा, 2K डिस्प्लेसह OnePlus 10 Pro लाँच होणार, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?
oneplus (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:00 AM

मुंबई : 2021 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 14 दिवसांनी 2022 हे नवीन वर्ष सुरु होईल. या वर्षाच्या पहिल्या तिमाहित अनेक लेटेस्ट स्मार्टफोन लाँच होणार आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वीच पुढच्या वर्षी लॉन्च होणार्‍या डिव्हाइसेसची माहिती समोर येऊ लागली आहे. OnePlus कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज लॉन्च करते, ज्यामध्ये अनेक चांगले फीचर्स आणि कॉन्फिगरेशन्स मिळतं. यावेळी ग्राहक OnePlus 10 सीरीजच्या फोनची वाट पाहत आहेत. कंपनीने अजून OnePlus 9RT भारतात सादर केलेला नाही. पण त्यापूर्वीच OnePlus 10 Pro बद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. (OnePlus 10 Pro specification details leake ahead of its launch)

OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल, जो 2K (2 हजार रिझोल्यूशन) सह बाजारात दाखल होईल. यात 120Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल, जो गेमिंग आणि स्क्रोलिंग अनुभव सुधारतो. यात LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनमध्ये एक सिंगल होल कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वरच्या डाव्या बाजूला आहे.

वनप्लस 10 प्रो मधील संभाव्य कॅमेरा सेटअप

डिजिटल चॅट स्टेशननुसार, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यापैकी प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल, तर सुपर वाईड अँगल कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल, तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे, जो 3X झूमसह सादर केला जाईल. यात सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

वनप्लस 10 प्रो मधील बॅटरी आणि चार्जिंग क्षमता

OnePlus 10 Pro च्या फास्ट चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन चार्ज करण्यासाठी 80W वायर फ्लॅश चार्ज मिळेल, तर 50W वायरलेस फ्लॅश चार्जर सपोर्ट उपलब्ध असेल. तसेच, हा फोन ColorOS 12 सिस्टमवर काम करेल, जो Android आधारित आहे.

वनप्लस 10 प्रो चा संभाव्य प्रोसेसर

OnePlus ने नेहमीच लेटेस्ट आणि फ्लॅगशिप प्रोसेसर वापरला आहे. यावेळी देखील कंपनी लेटेस्ट प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चा वापर करु शकते. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल.

OnePlus 9RT चे स्पेक्स आणि कॅमेरा सेटअप

OnePlus 9RT चीनमध्ये लाँच झाला आहे. ज्यामध्ये 6.62-इंचांचा ई 4 एमोलेड डिस्प्ले आहे, जो 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. तसेच, त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बसवला आहे. वनप्लस 9 आरटीच्या हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 12 जीबी पर्यंत रॅमसह येतो. तसेच, यात 256 GB UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन 19067.44 MM2 स्पेस कूलिंग सिस्टमसह येतो, जो गेमिंग दरम्यान स्मार्टफोन थंड ठेवतो.

OnePlus 9RT च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सोनी IMX766 चा सेन्सर आहे, ज्यामध्ये बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल f / 1.8 अपर्चर आहे, त्यामध्ये 6P लेन्स देण्यात आली आहे. ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन दोन्हीचे वैशिष्ट्य यामध्ये देण्यात आले आहे. तसेच, या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जो 123 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तसेच, यात 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(OnePlus 10 Pro specification details leake ahead of its launch)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.