प्रतीक्षा संपली! Redmi Note 10 च्या लाँचिंगचं काऊंटडाऊन सुरु

या महिन्याच्या सुरुवातीस स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने घोषणा केली होती की कंपनी मार्चमध्ये रेडमी सिरीजमधील स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.

प्रतीक्षा संपली! Redmi Note 10 च्या लाँचिंगचं काऊंटडाऊन सुरु
MI स्मार्टफोन

मुंबई : या महिन्याच्या सुरुवातीस स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने घोषणा केली होती की ते मार्चमध्ये रेडमी सिरीजमधील स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहेत. आता कंपनीने मार्चमध्ये भारतात रेडमी नोट 10 (Redmi Note 10) सिरीज लाँच करणार असल्याची पुष्टी केली आहे. यासोबतच कंपनीने फोनच्या लाँचिंगची अधिकृत तारीखही जाहीर केली आहे. (Redmi note 10 series smartphones is going to launch on 4th march know features and specification of this smartphone)

Redmi Note 10 सिरीजबाबत अनेकदा लीक्सच्या माध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे. शाओमीचा हा पहिला असा स्मार्टफोन आहे जो स्मूद रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. शाओमीची नोट सिरीज देशात खूपच लोकप्रिय ठरली आहे. दरम्यान, असं म्हटलं जातंय की, या स्मार्टफोनमध्ये कंपनी अनेक दमदार फीचर्स देणार आहे. रेडमी नोट 10 सिरीज भारतात बजेट रेंजमध्ये सादर केली जाईल. या फोनला रियलमी आणि ओप्पोसारख्या ब्रँड्सकडून टक्कर मिळणार आहे. कंपनीने लाँचिंगपूर्वीच नोट 10 चं प्रमोशन सुरु केलं आहे.

शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे की, Redmi Note 10 सिरीज स्मार्टफोन 4 मार्च 2021 रोजी लाँच केला जाईल. जैन यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, #RedmiNote10 सिरीज 4.3.21 रोजी ग्लोबल डेब्यूसाठी तयार आहे. या वर्षातील बेस्ट मिड-प्रीमियम फोनच्या लाँचिंगचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. #10on10 साठी तयार राहा. तसेच पुढे लिहिलं आहे की, 4+3+2+1 या तारखेतील अंकाची बेरीज करा आणि मला उत्तर द्या. सोबतच जैन यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत काही लोकांनी ह्युमन चेन तयार करुन 4 हा अंक तयार केला आहे.

फीचर्स

शाओमीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात रेडमी नोट 9 प्रो आणि प्रो मॅक्स हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले होते. स्पेक्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमी नोट सिरीजमध्ये 90Hz चा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. शाओमी कंपनीचं म्हणणं आहे की, हा स्मार्टफोन 120Hz स्क्रीन्ससह सादर केला जाऊ शकतो.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्यामध्ये अल्ट्रा वाइड लेंस, डेप्थ सेंसर और मॅक्रो सेंसर दिला जाईल. या फोनमध्ये NFC सपोर्टही दिला जाईल. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या फोनमध्ये 5050mAh क्षमतेची बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते. या फोनची किंमत 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

हेही वाचा

OnePlus Nord, Realme X7 5G ला टक्कर, Samsung चा Galaxy F62 लाँच, जाणून घ्या फीचर्स

फेब्रुवारी-मार्चमध्ये लाँच होणार हे पाच स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्सची माहिती

‘हे’ आहेत देशातील बेस्ट 5G स्मार्टफोन्स, किंमती 19999 रुपयांपासून…

(Redmi note 10 series smartphones is going to launch on 4th march know features and specification of this smartphone)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI