AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7560mAh बॅटरी,100W चॉर्जर असलेला Redmi Turbo 5 स्मार्टफोन लवकरच भारतात

रेडमी टर्बो ५ लवकरच भारतात लॉन्च होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. या फोनची मायक्रोसाइट ॲमेझॉनवर लाईव्ह झाली असून, हा फोन काळ्या रंगाच्या पर्यायात उपलब्ध होईल आणि त्यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल.

7560mAh बॅटरी,100W चॉर्जर असलेला Redmi Turbo 5 स्मार्टफोन लवकरच भारतात
Redmi Turbo 5Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 11:24 AM
Share

शाओमीचा उप-ब्रँड रेडमी लवकरच भारतात त्यांचा नवीन टर्बो सिरीज लाँच करत आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे की Redmi Turbo 5 भारतीय बाजारपेठेत लाँच होईल. विशेष म्हणजे भारतात येणारा हा रेडमी टर्बो सिरीजमधील पहिला स्मार्टफोन असेल. लाँचच्या आधी कंपनीने फोनच्या डिझाइनची झलक दाखवून अनेक तपशील उघड केले आहेत. Redmi Turbo 5 मध्ये दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि प्रीमियम डिझाइन असण्याची शक्यता आहे. अहवालानुसार हा फोन चीनमध्ये आधीच लाँच झाला आहे आणि भारतीय मॉडेल मोठ्या प्रमाणात त्याच्यासारखेच असण्याची शक्यता आहे. हा फोन ॲमेझॉनद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होईल.

या मोबाईलचा डिझाइन टीझरमधून नवीन प्रीमियम लूक समोर आला आहे. शाओमी इंडियाचे मार्केटिंग आणि पीआर असोसिएट डायरेक्टर यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये Redmi Turbo 5च्या भारतातील लाँचची पुष्टी केली. फोनची मायक्रोसाइट ॲमेझॉनवर देखील लाईव्ह झाली असून त्यावर त्याचे डिझाइन दाखवण्यात आले आहे. टीझरनुसार हा फोन काळ्या रंगाच्या पर्यायात उपलब्ध होईल आणि त्यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. दोन्ही कॅमेरा लेन्स वरच्या बाजूला वेगवेगळ्या डिझाइनमध्ये असून, त्यासोबत एक एलईडी फ्लॅश देखील आहे. फोनच्या मागील बाजूस फ्लॅट पॅनल डिझाइन असून, खालच्या बाजूला रेडमी ब्रँडिंग दर्शविले आहे. पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल्स उजव्या बाजूला आहेत. हे डिझाइन एक प्रीमियम आणि फ्लॅगशिप अनुभव देते.

उत्तम डिस्प्ले आणि पॉवरफूल प्रोसेसर एकत्र उपलब्ध

रेडमी कंपनीचा भारतीय मॉडेल जर चायनीज व्हेरिएंटसारखेच असेल तर रेडमी टर्बो 5 मध्ये 6.59-इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. या स्क्रीनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 3500 निट्सची पीक ब्राइटनेस असू शकते. हा फोन डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ ला सपोर्ट करेल अशीही अपेक्षा आहे.

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास यात 4nm-आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा चिपसेट आहे, जो उच्च कार्यक्षमता आणि गेमिंगसाठी शक्तिशाली मानला जातो.

कंपनी पॉवर युझर्स आणि गेमिंग शौकिनांना लक्ष्य करत असण्याची शक्यता आहे. भारतीय व्हेरिएंटची अधिकृत वैशिष्ट्ये अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत, परंतु चायनीज मॉडेलबद्दलच्या अपेक्षा लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.

मोठी बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंगमुळे हा फोन बनतो खास

Redmi Turbo 5 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या मॉडेलमध्ये 7560mAh क्षमतेची बॅटरी होती, जी सर्वसाधारण स्मार्टफोनच्या बॅटरीपेक्षा लक्षणीयरीत्या मोठी मानली जाते. यात 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे फोन खूप कमी वेळात चार्ज होतो. इतकेच नाही, तर यात 27W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसुद्धा आहे, म्हणजेच याचा वापर इतर उपकरणे चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो.

चीनमध्ये याची सुरुवातीची किंमत सुमारे 30 हजार रूपये इतकी होती, जिथे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट लाँच करण्यात आला होता. भारतातील याची किंमत आणि लाँचची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु टीझरनंतर हा फोन लवकरच लाँच होण्याची अपेक्षा आहे.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप.

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा