Smart TV होत आहे हँग? ‘हे’ 5 सोपे हॅक्स वापरून बनवा तो सुपरफास्ट!
आजकाल प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही हे एक सामान्य दृश्य आहे. मात्र अनेक वेळा या टीव्हीचा परफॉर्मन्स हळूहळू कमी होतो, अॅप्स उशिरा ओपन होतात आणि इंटरफेस हँग होतो. या लेखात आपण जाणून घेणार आहोत असे 5 सोपे हॅक्स, जे तुम्हाला नवीन टीव्ही घेतल्यासारखा अनुभव देतील.

आजकाल प्रत्येक घरामध्ये स्मार्टफोनप्रमाणेच स्मार्ट टीव्ही हाही अविभाज्य भाग बनला आहे. बाजारात स्मार्ट टीव्हींची मागणी वेगाने वाढत आहे आणि पारंपरिक टीव्ही आता मागे पडले आहेत. मात्र, सुरुवातीला गतीशील असणारा स्मार्ट टीव्ही काही काळाने अॅप्सच्या जड अपडेट्स, कमी RAM किंवा प्रोसेसरमुळे स्लो होतो, हँग होतो आणि युझर्सचा संयम सुटतो. अशा वेळी अनेकांना वाटतं की, आता नवीन टीव्ही घ्यावा लागेल. पण थांबा! अशी घाई करण्याआधी तुम्ही ‘हे’ 5 स्मार्ट हॅक्स वापरून तुमचा स्लो टीव्ही पुन्हा सुपरफास्ट करू शकता.
1. एनिमेशन स्पीड कमी करा
स्मार्टफोनप्रमाणेच टीव्हीमध्येही एनिमेशनसाठी अतिरिक्त संसाधनं लागतात. त्यामुळे जर एनिमेशन स्पीड कमी केला, तर टीव्ही हलका व जलद काम करतो.
हे कसं करायचं?
सर्वप्रथम TV च्या Settings > Device Preferences > About या पर्यायात जा.
Build Number वर रिमोटने सलग 7 वेळा क्लिक करा.
यामुळे Developer Options सक्रिय होतील.
त्यानंतर Window Animation Scale, Transition Animation Scale आणि Animator Duration Scale या तीनही पर्यायांना 0.5x वर सेट करा.
2. Usage Data आणि Auto Update बंद करा
बहुतेक टीव्ही मॅन्युफॅक्चरर्स सतत युजर डेटा ट्रॅक करतात. हे बॅकग्राउंडमध्ये सुरू असल्याने टीव्ही हळू होतो.
Settings > Usage & Diagnostics > Send Usage Data हे ऑप्शन Off करा.
त्याचप्रमाणे अॅप्सचे Auto Update बंद ठेवा.
3. Unused अॅप्स Uninstall करा
टीव्हीमध्ये अनेक वेळा आपण असे अॅप्स डाउनलोड करून ठेवतो जे वापरलेच जात नाहीत. हे अॅप्स RAM व्यापतात आणि स्पीड कमी करतात. त्यांना काढून टाका.
4. TV Reset करून Cache Clear करा
दर 2-3 महिन्यांनी टीव्ही Reset केल्यास त्याचा कॅशे मेमरी क्लिअर होते आणि गतीत वाढ होते. हा उपाय टीव्हीला रीफ्रेश करण्यासाठी उत्तम मानला जातो.
5. TV Stick वापरा
जर वरील सर्व उपाय करूनही तुमचा टीव्ही हँग होत असेल, तर Android TV Stick किंवा Streaming Box वापरणे हा उत्तम पर्याय आहे. हे स्टिक्स अधिक RAM व चांगला प्रोसेसर देतात आणि तुमचा जुना टीव्ही एकदम नवा वाटेल.
