AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंध लोकांसाठी बनविले सेंसरवाले बुट, दृष्टीहीन एकटे चालू शकणार, नववीच्या विद्यार्थ्याची कमाल

लहानपणापासून शास्त्रज्ञ होण्याची इच्छा असलेल्या अंकुर कर्माकर याने अंधांच्या मदतीसाठी खास बुट बनविले आहेत. ते वापरून अंधांना एकट्याने चालता येणार आहे.

अंध लोकांसाठी बनविले सेंसरवाले बुट, दृष्टीहीन एकटे चालू शकणार, नववीच्या विद्यार्थ्याची कमाल
shoesImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 18, 2023 | 6:42 PM
Share

नवी दिल्ली : अंध लोकांना त्यांच्या हातात सतत पांढरी काठी घेऊनच रस्त्यावर चालावे लागते. अंधांच्या या विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या काठीला असलेल्या बेलचा आवाज करून ते समोरील व्यक्तीला बाजूला करीत मार्गक्रमण करीत असतात. परंतू आता अंधांना स्मार्ट बुटाच्या  मदतीने समोरील अडथळा ओळखता येणार आहे. त्यामुळे अंधांसाठी समोर रस्ता कसा आहे हे ओळखण्यासाठी एक खास सेंसर असलेले बूट तयार करण्यात एका विद्यार्थ्याला यश आले आहे. हे बूट घालताच समोर काही अडथळा आल्यास या बुटाच्या सेंसरमधून विशिष्ट प्रकारचा बजरचा आवाज ऐकायला येण्याची सोय असून त्यामुळे अंधांना कोणाची मदत न घेता चालता येणार आहे.

आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील रोलॅंड मेमोरिअल हायस्कूलच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या अंकुर कर्मकार या विद्यार्थ्याने हे सेंसरवाले बुट नेत्रहीन लोकांनासाठी तयार केले आहेत. या बुटातील सेंसर त्याच्या समोर काही वस्तू आल्यास बजर वाजवून अंध लोकांना सचेत करुन पुढील धोक्याची घंटा देते. त्यामुळे अंधलोक अधिक सावधानतेने त्यांचा रस्ता शोधू शकणार आहेत.

वृत्तसंस्था एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात बातमी दिली आहे. करीमगंजच्या अंकुर कर्मकार या नववीच्या विद्यार्थ्याने नेत्रहीनांच्या मदतीसाठी अनोखे सेंसरवाले बूट तयार केले आहेत. आपल्याला शास्रज्ञ बनायचे आहे. त्यामुळे अंधाच्या मदतीसाठी आपण सेंसरवाले बुट प्रथम बनविले आहेत. लोकांचे जीवन सहज आणि सोपे बनविण्यासाठी आपण विविध पातळीवर काम करीत आहोत. या बुटाला परीधान करणाऱ्या अंधव्यक्तीला त्याच्या समोर कोणतीही वस्तू किंवा अडथळा येताच  बजरद्वारे सूचना मिळेल. या बुटाचे मॅकेनिझम छोट्या बॅटरीवर काम करते.

शास्त्रज्ञ होण्याची इच्छा

अंकुर कर्माकर यांनी म्हटले आहे की, ‘वाटेत काही अडथळे आल्यास, बुटातील सेन्सर त्याला ओळखतील आणि बजर अलर्ट करेल. जेव्हा बझर वाजतो तेव्हा दृष्टिहीन व्यक्तीला तो ऐकू येईल आणि ते सावध रहातील आणि अडथळा टाळून मार्ग काढतील. लहानपणापासून शास्त्रज्ञ होण्याची इच्छा असलेल्या अंकुर कर्माकर यांनी ग्रेट ब्रिटनमधील तंत्रज्ञ व्यक्तीकडून प्रेरणा घेत असा बूट बनवला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.