Tik Tok ने डिलीट केलेले 60 लाख व्हिडीओ कोणते?

सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असलेल्या टिकटॉक (Tik Tok ) या मोबाईल व्हिडीओ अॅप्लिकेशनने तरुण-तरुणींना अगदी झपाटून टाकलंय. मात्र आता याचं टिक टॉकने (Tik Tok ) युझर्सना दणका दिला आहे.

Tik Tok ने डिलीट केलेले 60 लाख व्हिडीओ कोणते?

मुंबई :  सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असलेल्या टिकटॉक (Tik Tok ) या मोबाईल व्हिडीओ अॅप्लिकेशनने तरुण-तरुणींना अगदी झपाटून टाकलंय. मात्र आता याचं टिक टॉकने (Tik Tok ) युझर्सना दणका दिला आहे. 60 लाखांहून अधिक व्हिडिओ (Tik Tok Video) टिकटॉकनं डिलीट केले आहेत. याचं कारणही तसंच आहे, टिकटॉकवरील काही युजर्स जास्तीत जास्त लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात अश्लीलता, धार्मिक तेढ, आक्षेपार्ह वर्तन आणि वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केले जात होते. हे व्हिडिओ भारतातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे होते. त्यामुळेच टिकटॉकवरील बेकायदेशीर आणि अश्लील कंटेंटवर रोख बसावी यासाठी आपण कारवाई केल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान टिकटॉक अॅप हे सोशल मीडियामधील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. या अॅपद्वारे मोबाईलमध्ये 15 ते 20 सेकंदाचे शॉर्ट व्हिडीओ तयार करून तो शेअर केला जातो. काहीजण केवळ निखळ मनोरंजन व्हावे या उद्देशाने टिकटॉकवर सक्रिय होतात.मात्र काही जण या माध्यमातून देशविघाताचे संदेश पसरवत असल्याचं काहीदिवसांपूर्वी समोर आलं होतं.

VIDEO: ले पंगा! बच्चू कडूंचा TikTok व्हिडीओ व्हायरल 

अशाच प्रकारच्या टिकटॉक व्हिडिओमुळे स्वदेशी जागरण मंचानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच याआधी देखील टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती. यावर सरकारनं टिकटॉकला नोटीस पाठवली आणि योग्य दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

यावेळी सरकानं काही प्रश्न देखील टिकटॉक विचारले-

– आक्षेपार्ह मजकुरावर कशाप्रकारे नजर ठेवली जाते?

– एखादा आक्षेपार्ह व्हिडिओ आल्यास तो कसा थांबवला जातो?

– 18 वर्षांखालील मुलांसाठी काय नियम बनवण्यात आलेत?

– इतर देशांत हे अॅप वापरण्यासाठी वयाची अट आहे?

बातम्यांची सत्यता पडताळण्यासाठी काय केलं जातं ?

सरकारनं नोटीस बजावल्यानंतर टिकटॉकनं 60 लाख वादग्रस्त व्हिडिओ डिलीट केले आहेत.

भारतात सध्याच्या घडीला 20 कोटी लोक टीकटॉकचा वापर करत आहेत. या अॅपद्वारे विनोदी गाणी, नृत्य असे विविध व्हिडिओ तयार करण्यात येतात. गाव असो वा शहर या अॅपची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. मात्र कंपनी कडून गैरवार करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे टिकटॉकचा गैरवापर वाढला होता. मात्र सरकारनं टिकटॉकला दणका दिल्यानंतर आता टिकटॉकनंही अॅपचा गैरवापर करणाऱ्या युझर्सना दणका दिला आहे.

संबंधित बातम्या 

तीन वर्षापूर्वी हरवलेला पती Tik Tok वर मिळाला   

Tik-Tok च्या नादात बंदुकीतून गोळी झाडली, तरुणाचा जागीच मृत्यू   

VIDEO: ले पंगा! बच्चू कडूंचा TikTok व्हिडीओ व्हायरल  

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI