अटक आणि दंडाच्या भीतीपोटी केंद्र सरकारने सांगितलेल्या अकाऊंट्सवर ट्विटरची कारवाई

आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेच्या आणि पेनल्टीच्या (दंड) भीतीपोटी ट्विटरने भारत सरकारचे आदेश मानन्यास सुरुवात केली आहे.

अटक आणि दंडाच्या भीतीपोटी केंद्र सरकारने सांगितलेल्या अकाऊंट्सवर ट्विटरची कारवाई
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 12:42 PM

नवी दिल्ली : आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेच्या आणि पेनल्टीच्या (दंड) भीतीपोटी ट्विटरने भारत सरकारचे आदेश मानन्यास सुरुवात केली आहे. सरकारने ट्विटरला दिलेल्या अकाऊंट्सच्या यादीमधील काही अकाऊंट्स ब्लॉक करण्यास ट्विटरने सुरुवात केली आहे. या ट्विटर हँडल्सवरुन कथित प्रक्षोभक/वादग्रस्त आणि द्वेष पसरवणाऱ्या कंमेट्स आणि पोस्ट्स करण्यात आल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. (Twitter starts blocking accounts flagged by govt after warning of arrest and penalty)

ट्विटरने सरकारला आश्वासन दिले आहे की सरकारने त्यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये ज्या ट्विटर हँडल्सचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांचे ट्विट्स तपासले जातील, त्यांचे अकाऊंट्स पाहिले जातील. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अॅक्ट 69 ए (IT Act 69 A) अंतर्गत ट्विटरला नोटीस पाठवली होती.

टीओआयने दिलेल्या माहितीनुसार , #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगसह ट्विट केलेल्या 257 पैकी 126 हॅशटॅग डिअॅक्टिव्हेट करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने हे अकाऊंट्स ब्लॉक केले होते, परंतु लगेचच त्यांनी हे अकाऊंट्स अनब्लॉक केले. हे अकाऊंट्स अनब्लॉक करताना ट्विटरने म्हटलं होतं की तुमचे ट्विट्स हे ‘फ्री स्पीच’मध्ये मोडतात. आता यापैकी काही अकाऊंड्स पुन्हा ब्लॉक करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने अजून 1,178 अकाउंट्सची एक यादी ट्विटरला पाठवली आहे. जे अकाऊंट्स खालिस्‍तान आणि पाकिस्‍तानशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यापैकी 583 अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट करण्यात आले आहेत. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की, या अकाऊंट्सवरुन होत असलेल्या ट्विट्स आणि कमेंट्मुळे शेतकरी आंदोलनाशी संबंधित यंत्रणेस धोका निर्माण होऊ शकतो’.

दरम्यान, गेल्या आठवड्यात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ट्विटरनं 250 वापरकर्त्यांची अकाऊंटस ब्लॉक केली आहेत. त्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘Modi Planning Farmer Genocide ‘ हा हॅशटॅग चालवण्यात आला होता. त्याद्वारे चुकीची आणि प्रक्षोभक वक्तव्य 30 जानेवारीला केली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्विटरनं केलेल्या कारवाईत प्रसार भारतीच्या सीईओचे ट्विटर अकाऊंट देखील सस्पेंड करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालय आणि कायदेविषयक संस्थांच्या विनंतीवरुन केंद्रीय आयटी मंत्रालयाकडून ट्विटरला संबंधित अकाऊंटसवर कारवाई करण्याबाबत कळवण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात संबंधित ट्रेंडमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 250 जणांची अकाऊंटस ब्लॉक करण्यात आली आहेत, अशी माहिती मिळतेय. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे.

हेही वाचा

डेबिट कार्ड स्वाईप न करता आता घड्याळाद्वारे भरा बिल, एसबीआयची ग्राहकांसाठी नवी सुविधा

भारतात आता मेड इन इंडिया Appsचा बोलबाला, चिनी कंपन्यांची सद्दी संपली

भारतात 5G सेवा सुरु होणार, सरकारकडून जोरदार तयारी

(Twitter starts blocking accounts flagged by govt after warning of arrest and penalty)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.