AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gmail मध्ये Undo चा वेळ वाढवता येतो का? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत. Gmail मध्ये Undo चा वेळ सहज वाढवता येऊ शकते का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? नसेल पडला तर चिंता करू नका. Undo चा वेळ कसा वाढवायचा, याविषयी जाणून घेऊया.

Gmail मध्ये Undo चा वेळ वाढवता येतो का? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jan 21, 2025 | 2:53 PM
Share

अरेरे हे काय झालं, असं म्हणण्याची वेळ अनेकदा आपल्यावर मेल सेंड केल्यानंतर येते. चुकून चुकीचा मेल पाठवण्यात आला. मग Undo करायला गेले की तिकडचीही वेळ निघून गेलेली असते. पण, चिंता करू नका. पुढच्या वेळी ही चूक टाळण्यासाठी आजच Gmail च्या सेटिंग्जमध्ये बदल करा. जीमेलमध्ये Undo ची वेळ आपण सहज वाढवू शकता. यासाठी ट्रिक जाणून घ्या.

Gmail चा वापर जगभरातील लोक करत आहेत. कंपनी आपल्या युजर्ससाठी अनेक अपडेट्स देखील आणते. मात्र Gmail मध्ये असे अनेक फीचर्स आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चुकून चुकीचा मेल पाठवला गेला असेल असं तुमच्याबाबतीत घडलं असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

फक्त काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही जीमेल मध्ये Undo पाठवण्याची वेळ सहज वाढवू शकता. म्हणजे चूक झाली तरी टेन्शन घ्यावं लागणार नाही.

Gmail मध्ये Undo ची वेळ कशी वाढवावी?

1.सर्वप्रथम लॅपटॉपवर आपला मेल आयडी लॉगिन करा. 2.यानंतर उजव्या कोपऱ्यातील सेटिंग्जमध्ये जाऊन सर्व सेटिंग्ज बघायला जा. 3.तुम्ही Gmail मध्ये Undo ची वेळ 30 सेकंदांपर्यंत वाढवू शकता. 4.सी ऑल सेटिंग्जवर क्लिक करताच तुम्हाला येथे Undo सेंडचा पर्याय दिसेल. ज्यानंतर सेंड कॅन्सलेशन पीरियड लिहिला जाईल. येथे 5.डिफॉल्टने पाठविलेल्या Undo ची वेळ 5 सेकंद दिली जाते. 6. 5 सेकंदावर क्लिक करताच तुम्हाला येथे 5 ते 30 (5, 10, 20 आणि 30) असे पर्याय दिसतील. 7. तुमच्या इच्छेनुसार वेळ निवडून Undo सेंडची वेळ बदला. अशावेळी जर तुम्ही एखादा Gmail चुकीच्या पद्धतीने पाठवला असेल तर तो पूर्ववत पाठवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल.

वर आम्ही तुम्हाला Undo सेंडची वेळ कशी बदलायची याविषयीची माहिती दिली आहे. पण, लक्षात घ्या की, कोणतेही ऑफिसचे काम करताना किंवा त्यासंदर्भात मेल पाठवताना एकदा व्यवस्थित झाल्याची खात्री करा, त्यानंतर तो पाठवा. कारण, अनेकदा यामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकतो. किंवा अर्धवट मेल जाऊ शकतो. त्यामुळे आपण मेल टाईप करतानाच सर्व गोष्टी तपासून त्यानंतर एकदा अंतिम नजर मारून तुम्ही मेल फायनली पाठवू शकतात. तुम्ही लगेच तुमच्या मेलमध्ये वरील माहितीच्या आधारे Undo सेंडची वेळ देखील बदलून लगेच सेफ होऊ शकतात. कारण, अशी वेळ कधीही येऊ शकते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.