AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chrome वापरता? मग ‘ही’ सिक्रेट सेटिंग लागलीच ऑन करा, बॅटरी टिकेल तब्बल 30% जास्त!

Google Chrome वापरकर्त्यांसाठी बॅटरीचे जलद संपणे मोठा त्रास ठरतो. पण आता एक सिक्रेट Energy Saver मोड तुमची बॅटरी तब्बल 30% जास्त टिकवू शकतो. पण हा मोड खरंच फायदेशीर ठरेल की नाही? त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी खालील लेख नक्की वाचा!

Chrome वापरता? मग ‘ही’ सिक्रेट सेटिंग लागलीच ऑन करा, बॅटरी टिकेल तब्बल 30% जास्त!
CHROME
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 3:14 PM
Share

आपण सर्वजण दररोज आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर Google Chrome ब्राउझरचा वापर करत असतो. हा ब्राउझर जरी वेगवान आणि उपयोगी असला, तरी तो बॅटरीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो, हे अनेकांनी अनुभवले असेल. विशेषतः लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी Chrome हे एक ‘बॅटरी ड्रेनिंग’ अ‍ॅप मानलं जातं. पण Google ने या समस्येवर उपाय शोधला आहे. Chrome ब्राउझरमध्ये एक सिक्रेट सेटिंग आहे जी ‘Energy Saver’ मोड म्हणून ओळखली जाते. ही सेटिंग सक्रिय केल्याने तुमच्या लॅपटॉपची बॅटरी आयुष्य लक्षणीय वाढू शकते.

Energy Saver मोड म्हणजे ?

Google ने Chrome च्या नवीन अपडेटमध्ये ‘Energy Saver Mode’ नावाची फिचर दिली आहे. या मोडमध्ये Chrome ब्राउझर बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटी, अ‍ॅनिमेशन, व्हिडीओ फ्रेम्स आणि इतर बॅटरी-खाऊ फिचर्सवर मर्यादा आणतो. यामुळे ब्राउझरची कार्यक्षमता फारशी कमी न होता बॅटरीचे आयुष्य वाढते. ही फिचर विशेषतः लॅपटॉप युजर्ससाठी उपयुक्त आहे, कारण त्यांना चार्जरशिवाय अनेक वेळा Chrome वापरावा लागतो.

ही सिक्रेट सेटिंग कशी चालू कराल?

1. सर्वप्रथम तुमच्या Chrome ब्राउझरला अपडेट करा.

2. ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये chrome://settings/performance असे टाइप करा आणि Enter द्या.

3. इथे तुम्हाला Energy Saver नावाचा पर्याय दिसेल.

4. हा पर्याय “Turn on when battery is at 20%” किंवा “Turn on when unplugged” अशा दोन पर्यायांसह येतो.

5. तुमच्या गरजेनुसार एक पर्याय निवडा आणि सेटिंग ऑन करा.

6. ही सेटिंग सक्रिय केल्यावर Chrome तुमचं बॅटरी वापर कमी करतं आणि बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अनावश्यक टॅब्सना थांबवतं. यामुळे तुमचा डिव्हाइस अधिक काळ चालू राहतो आणि गरज नसताना बॅटरीची नासधूस होत नाही.

ही सेटिंग कोणत्या डिव्हाइसेसवर चालते?

Energy Saver मोड Windows, macOS, ChromeOS आणि Linux वर चालतो. ही सुविधा सध्या Android Chrome ब्राउझरमध्ये उपलब्ध नाही, पण भविष्यात त्यातही समावेश होण्याची शक्यता आहे.

किती बॅटरी बचत होते?

Google च्या अंतर्गत चाचण्यांनुसार, Energy Saver मोड ऑन केल्यावर Chrome ब्राउझरमुळे होणारा बॅटरीचा वापर 30% पर्यंत कमी होऊ शकतो. विशेषतः व्हिडीओ स्ट्रीमिंग, मल्टीटॅब ब्राउझिंग किंवा अ‍ॅनिमेशन-heavy वेबसाइट्स वापरताना याचा अधिक फरक जाणवतो.

बॅटरी वाचवण्यासाठी अतिरिक्त टिप्स

1. recent टॅब्स बंद करा.

2. Chrome मध्ये अ‍ॅड-ऑन किंवा एक्सटेंशन्स कमी करा.

4. Hardware Acceleration बंद करा जर ती बॅटरी जास्त घेत असेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.