UPI Payment | परदेशात कसे करणार UPI ने पेमेंट? जाणून घ्या या सोप्या स्टेप्स

UPI Payment | युपीआयचा आता परदेशात पण डंका वाजला आहे. युपीाय पेमेंट आता परदेशात पण करता येईल. दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशात तुम्हाला युपीआयचा वापर करता येईल. या देशात भारतीय युपीआयच्या मदतीने पेमेंट करता येईल. या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करता येईल.

UPI Payment | परदेशात कसे करणार UPI ने पेमेंट? जाणून घ्या या सोप्या स्टेप्स
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 11:02 AM

नवी दिल्ली | 24 February 2024 : भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (UPI) परदेशात पण डंका वाजला आहे. दक्षिण-पूर्व आशियातील 10 देशांमध्ये युपीआयचा वापर वाढला आहे. यामध्ये मलेशिया, थायलंड, जापान, सिंगापूर सारख्या देशांचा यामध्ये समावेश आहे. जर तुम्ही या देशात फिरायला, शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त अथवा इतर काही कारणासाठी या देशात जाणार असला तर तुमच्यासाठी चांगली आहे. या देशांमध्ये तुम्हाला युपीआय पेमेंट करता येईल. जाणून घ्या कसे पेमेंट करता येईल ते…

या देशात वापर

युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (UPI) वापर भारतासह इतर देशात पण करता येत आहे. यामध्ये नेपाळ, भूतान, श्रीलंका, मॉरीशस, ओमान, युएई, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. इतर अनेक देश पण युपीआय पेमेंटसाठी उत्सूक आहेत. याविषयीच करार झाल्यावर या देशात पण झटपट पेमेंट करता येईल.

हे सुद्धा वाचा

काय होईल फायदा

आता या देशांमध्ये भारतीय चलन बदलण्याचा त्रास वाचणार आहे. या देशात गेल्यावर भारतीय नागरिकांना थेट युपीआय पेमेंट करता येईल. युपीआय पेमेंट करण्यासाठी युपीआय एप्सचा वापर करावा लागेल. तुम्हाला युपीआयची आंतरराष्ट्रीय सेवेचा असा लाभ घेता येईल.

परदेशात जाण्याअगोदर युपीआयसाठी या स्टेप्स फॉलो करा

PhonePe युझर्स हे करा काम

  • UPI एप उघडा. तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा
  • पेमेंट सेटिंग सेक्शनमध्ये युपीआय इंटरनॅशनल निवडा
  • ज्या बँकेचे खाते या परदेशातील पेमेंटसाठी वापरायचे आहे, त्यावर क्लिक करुन एक्टिव्ह करा
  • एक्टिव्ह करण्यासाठी युपीआय पिन टाका. युपीआय इंटरनॅशनल पेमेंट सेवा सुरु होईल

Google Pay वरुन असे करा पेमेंट

  • Google Pay एप उघडा आणि QR कोड स्कॅन करा
  • इंटरनॅशनल मर्चेंटचे क्यूआर कोड स्कॅकन करा
  • परदेशी चलनात पेमेंटची रक्कम नोंदवा
  • त्यानंतर तुमचे बँक खाते निवडा. त्याआधारे पेमेंट करता येईल
  • ‘UPI International’ एक्टिव्ह करण्यासाठी एक स्क्रीन दिसेल
  • UPI इंटरनॅशनल सक्रिय केल्यानंतर ही सेवा सुरु होईल

या गोष्टींकडे द्या लक्ष

  • ज्या बँका आंतरराष्ट्रीय सेवा पुरवितात, त्यांच्या ग्राहकांना होणार फायदा
  • युपीआय इंटरनॅशनल ज्या बँकांच्या आधारे चालते, त्यांना करता येईल पेमेंट
  • तुमच्या खात्यातून जी रक्कम कपात होईल, ती भारतीय चलनात देय असेल
  • रक्कम हस्तांतरणासाठी, चलन विनिमय दरासंदर्भातील नियम आणि शुल्क लागू असेल
Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.