VLC Media Player भारतात आता ‘या’ प्लॅटफॉर्मवर नाही चालणार ; जाणून घ्या कारण

भारतात विंडोज प्लॅटफॉर्मवर VLC Media Player ला बंदी घालण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार, भारतात VLC Media Player ब्लॉक करण्यात आले आहे, दोन महिन्यांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

VLC Media Player भारतात आता 'या' प्लॅटफॉर्मवर नाही चालणार ; जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 2:18 PM

VLC Media Player ची लोकप्रियता आणि त्याचे महत्त्वतर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र आत भारतात (India) VLC Media Player ब्लॉक करण्यात आले आहे. MediaNamaच्या रिपोर्टनुसार, विंडोज प्लॅटफॉर्मवर (windows platform) व्हीएलसी मीडिआ प्लेअरला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही घटना सुमारे 2 महिन्यांपूर्वी घडली होती. या बंदी संदर्भात त्या कंपनीतर्फे किंवा भारत सरकारतर्फेही (VLC Media Player banned in India) कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, VLC Media Player हे कोणतीही चिनी कंपनी ऑपरेट करत नसून ते पॅरिसमधील VideoLAN या फर्मद्वारे तयार करण्यात आले आहे. मात्र या बंदीला आता दोन महिन्यांहून अधिक काळ उलडून  गेला आहे. त्यामुळे विंडोज प्लॅटफॉर्मवर आता व्हीएलसी मीडिया प्लेअर चालू शकत नाही.

काय आहे बंदीमागचे कारण ?

व्हीएलसी मीडिया प्लेअरवरील बंदी मागचे कारण टिप्स्टर अभिषेक यादव याने स्पष्ट केले आहे. त्याने यासंदर्भात एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘हॅकिंग’ हे व्हीएलसी मीडिया प्लेअरवरील बंदीचे खरे कारण आहे. खरंतर, एक चीनी हॅकिंग ग्रुप व्हीएलसी मीडिया प्लेअरच्या मदतीने हॅकिंग करत असल्याचे समोर आले आहे. आयटी नियम 2000 च्या अंतर्गत, इलेक्ट्ऱॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार, व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईटवर सुमारे दोन महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली. मात्र त्याचे ॲप ॲंड्रॉईड प्लॅटफॉर्मवर अद्यापही उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

2020 साली अनेक ॲप्स करण्यात आले ब्लॉक –

सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक चिनी ॲप्स ब्लॉक केले आहेत.  2020 साली भारत सरकारने काही चिनी ॲप्स ब्लॉक केले होते, ज्यामध्ये PUBG मोबाईल गेम, टिकटॉक यासारख्या अनेक ॲप्सचा समावेश होता. त्यानंतर सरकारने PUBG मोबाईलचे भारतीय रुपांतरण असलेला BGMI यावरही भारतात बंदी घातली होती. या निर्णयानंतर ते गूगल प्ले स्टोअर आणि iOS स्टोअरवरूनही हटवण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.