वीज वाचवण्यासाठी वायफाय बंद करता? मग हे 5 धोके आधी वाचा नाहीतर पश्चात्ताप होईल!
रात्री वायफाय बंद केल्यामुळे वीजेची थोडी बचत जरूर होते, पण त्यामुळे स्मार्ट उपकरणांपासून ते राउटरच्या अपडेट्सपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होतो. त्यामुळे केवळ बचतीच्या हेतूने दररोज राउटर बंद करणं टाळावं. त्याऐवजी, अधिक स्मार्ट आणि स्थायिक उपाय निवडणं केव्हाही चांगलं!

आजच्या डिजिटल युगात वायफाय हे आपल्या जीवनाचं अविभाज्य भाग बनलं आहे. घरात स्मार्टफोनपासून स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, कॅमेरा, थर्मोस्टॅट्सपर्यंत सगळंच इंटरनेटवर चालतं. मग दिवसा असो की रात्र, वायफाय राउटर चालूच असतो. काही लोक मात्र वीजेची बचत व्हावी म्हणून झोपताना वायफाय बंद करतात. पण खरंच यामुळे तुमचं वीज बिल कमी होतं का? आणि याचा तुमच्या स्मार्ट उपकरणांवर काही परिणाम होतो का? चला, याचं स्पष्ट उत्तर जाणून घेऊया.
राउटर बंद केल्यामुळे होणारे नुकसान
1. तुमचे स्मार्ट टीव्ही, सिक्युरिटी कॅमेरे, अॅलेक्सा/गुगल असिस्टंट, थर्मोस्टॅट्स यांसारखी उपकरणं इंटरनेटवर अवलंबून असतात. राउटर बंद केला की ही डिव्हाइसेस काम करेनाशी होतात, आणि तुमची सुरक्षा किंवा सोय दोन्ही धोक्यात येते.
2. रात्रीच्या वेळी अनेकदा राउटरसाठी सुरक्षा व कार्यक्षमता सुधारणा करणारे अपडेट्स येतात. राउटर बंद असेल, तर हे अपडेट्स होत नाहीत, ज्यामुळे तुमचं नेटवर्क असुरक्षित होऊ शकतं.
3. राउटर २४/७ चालू राहण्यासाठी डिझाइन केलेला असतो. तो वारंवार बंद-चालू केल्याने हार्डवेअरवर ताण येतो, ज्यामुळे राउटर लवकर खराब होण्याची शक्यता वाढते.
4. सतत राउटर बंद केल्याने नेटवर्कची स्टेबिलिटी बिघडते. यामुळे इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो, सिग्नल ड्रॉप्स, कनेक्टिव्हिटी इश्यूज निर्माण होऊ शकतात.
5. तुमचं मोबाईल, लॅपटॉप, किंवा CCTV सारखी उपकरणं रात्री क्लाउडमध्ये बॅकअप/अपडेट करत असतात. राउटर बंद असल्यास ही प्रक्रिया अर्धवट राहते, आणि काही महत्त्वाची माहिती हरवण्याचा धोका निर्माण होतो.
मग करायचं काय?
जर वीजेची चिंता असेल, तर राउटरचं पॉवर-सेव्हिंग मोड पाहा. काही राउटरमध्ये हे पर्याय उपलब्ध असतात. शिवाय, रात्री नेटवर्क बंद करणं आवश्यक वाटत असेल, तर वेळ ठरवून राउटर ‘शेड्यूल’ मोडमध्ये ठेवता येतो – यासाठी काही स्मार्ट राउटर अॅप्स मदत करतात.
