AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Xiaomi चा स्मार्टफोन तिसऱ्यांदा महागला, ‘या’ बजेट फोनमध्ये काय आहे खास?

रेडमी (Redmi) कंपनीने रेडमी नोट 10 सिरीजमधील (Redmi Note 10 Series) स्मार्टफोन भारतात किफायतशीर किंमत आणि दमदार फीचर्ससह लाँच केले होते.

Xiaomi चा स्मार्टफोन तिसऱ्यांदा महागला, 'या' बजेट फोनमध्ये काय आहे खास?
Redmi Note 10 Series
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 5:30 PM
Share

मुंबई : रेडमी (Redmi) कंपनीने रेडमी नोट 10 सिरीजमधील (Redmi Note 10 Series) स्मार्टफोन भारतात किफायतशीर किंमत आणि दमदार फीचर्ससह लाँच केले होते. या सिरीजमधील सर्वात स्वस्त डिव्हाइस म्हणजे रेडमी नोट 10. हे डिव्हाइस रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्ससोबतच लाँच केले होते. परंतु लाँचिंगनंतर काही महिन्यांतच, या स्मार्टफोनची किंमत तिसऱ्यांदा वाढली आहे. (Xiaomi Redmi Note 10 price increased 3rd time, check new prices)

शाओमीने हा फोन देशात 11,999 रुपयांमध्ये लाँच केला होता, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली होती. त्याचबरोबर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 13,999 रुपये इतकी ठेवण्यात आली होती.

रेडमी नोट 10 चे दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. एप्रिलच्या अखेरीस या फोनची किंमत 500 रुपयांनी वाढविली होती. त्यावेळी, ही किंमत पहिल्या व्हेरिएंटसाठी 12,499 रुपये आणि दुसर्‍या व्हेरिएंटसाठी 14,499 रुपये ठेवण्यात आली होती. जेव्हा डिव्हाइसची किंमत दुसऱ्यांदा वाढवण्यात आली तेव्हा त्यात पुन्हा 500 रुपयांची वाढ करण्यात आली.

फोनची किंमत तिसऱ्यांदा वाढवली

आता या फोनची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. परंतु कंपनीने पुन्हा एकदा 500 रुपयांनी या फोनची किंमत वाढवली आहे. आता फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी महाग झाली आहे. व्हेरिएंटची किंमत आता 12,999 रुपयांवर गेली आहे. आपण mi.com वर नवीन किंमती तपासू शकता. तसेच आपण हे स्मार्टफोन ऑफलाइन स्टोअरमधून किंवा अमेझॉनवरुन देखील खरेदी करू शकता.

फोनचे फीचर्स

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह हा रेडमी नोट 10 अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 वर चालतो आणि 6.43 इंच फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा पीक ब्राइटनेस 1100 nits पर्यंत आहे. या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. याची बॅटरी 5000 एमएएच असून 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग देखील सपोर्टेड आहे. तसेच, त्यात एक झेड-अॅक्सिस वायब्रेशन मोटर आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी पर्यंतचा LPDDR4x रॅम आणि Adreno 612 GPU सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी 48 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. रेडमी नोट 10 अॅक्वा ग्रीन, फ्रॉस्ट व्हाईट आणि शॅडो ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

इतर बातम्या

WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा

भारतात Nokia चा पहिला 5G फोन लवकरच लाँच होणार, ‘या’ स्मार्टफोन्सची एंट्री

64MP कॅमेरा, 8GB रॅम, नव्या Mi 11 Lite वर 3000 रुपयांचा डिस्काउंट

(Xiaomi Redmi Note 10 price increased 3rd time, check new prices)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.