AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2023 | म्हणाल तर सर्वात कठीण पासवर्ड, पण काही सेकंदातच केला क्रॅक

Year Ender 2023 | इंटरनेट युझर्स देशाच्या नावाने त्यांचे पासवर्ड ठेवतात. भारतीय असतील तर ते त्यांचा पासवर्ड India@123 असा ठेवतील. अनेक लोक 12345 असा पासवर्ड ठेवतात. काही जण पत्नीच्या, प्रेयसीच्या नावे पासवर्ड ठेवतात. आता इतका सिक्रेट पासवर्ड लवकर उघड होऊ शकतो का? तर त्याचे उत्तर 'नाही' असे मुळीच नाही....

Year Ender 2023 | म्हणाल तर सर्वात कठीण पासवर्ड, पण काही सेकंदातच केला क्रॅक
| Updated on: Dec 29, 2023 | 5:13 PM
Share

नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : यावर्षातील 2023 मधील हा शेवटचा महिना आहे. या महिन्यात वर्षभरातील अनेक क्षेत्रातील धांडोळा घेण्यात येतो. माहिती जमा करण्यात येते. त्याचे विश्लेषण करुन निष्कर्षही मांडण्यात येतात. अशीच एक चर्चा रंगली आहे ती यावर्षातील सर्वात खतरनाक पासवर्डची. आपण अनेक जण देशभक्त, राष्ट्रभक्त आहोत. देशाच्या नावे अनेक जण पासवर्ड ठेवतात. तर काही जण पत्नी, प्रेयसीच्या नावे, अथवा त्यांच्या क्रशच्या नावे पासवर्ड ठेवतात. तुमच्या दृष्टीने हा तर अत्यंत सिक्रेट पासवर्ड आहे नाही का? पण गमंत म्हणजे यातील अनेक पासवर्ड अगदी काही सेकंदात क्रॅक झाले. हे पासवर्ड अर्थातच अंक आणि अक्षरांनी तयार करण्यात आले होते. यामध्ये काहींनी स्पेशल कॅरेक्टर ठेवले नव्हते. त्यामुळे ते सहजरित्या क्रॅक झाले.

देशाच्या नावे पासवर्ड

इंटरनेट युझर्स त्यांच्या देशाच्या नावे पासवर्ड ठेवतात. जसे की भारतीय नागरिकाचा पासवर्ड India@123 असा अथवा थोडाफार वेगळा असेल. पण असा पासवर्ड ठेवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जगातील अनेक देशातील नागरिक पण अशीच कॉमन ट्रिक वापरतो. कारण हा पासवर्ड आठवायला, लक्षात ठेवायला सोपा असतो. तर एडमिन या शब्दाभोवती पण अनेक पासवर्ड असल्याचे समोर आले आहे. या शब्दाचा वापर करुन अनेकांनी पासवर्ड तयार केल्याचे समोर आले. हा सर्वसामान्य पासवर्ड ठरला आहे. अनेक देशातील युझर्सने या शब्दाचा वापर करुन पासवर्ड तयार केल्याचे उघड झाले.

Password हा शब्दच पासवर्ड

आता सर्वच गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे किती कष्ट नाही का? तर गेल्यावर्षी अनेक लोकांनी हँकर्सला चुकांडा देण्यासाठी Password हा शब्दच पासवर्ड ठेवला. आता का बोलावे? हँकर्स इतके पण मूर्ख असतात का बरं? तुम्हीच सांगा. पण हा आळस अनेकांना भोवला. हँकर्स अगोदरच सोप्या शब्दांचे पासवर्ड लिलया उलगडतात हे अनेकदा समोर आले आहे. मेलवेअरने यासंबंधीची माहिती उघड केली आहे. सायबर सुरक्षेसंदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार अनेक जणांना माहिती सुद्धा होत नाही की, त्यांचा संगणक, मोबाईल हॅक करण्यात आलेला आहे.

संख्यात्मक पासवर्ड

जगभरातील काही लोकांना तर अक्षर टाईप करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. त्यांना वाटते अंकाचा वापर करुन पासवर्ड तयार केला तर कोणालच कळणार नाही. जगभरातील 31 टक्के युझर्स संख्यात्मक, अंकांचा पासवर्ड तयार करतात. जसे की, ‘123456789’, ‘12345’, ‘000000’ अशा अंकाचा त्यात वापर होतो. एका रिपोर्टनुसार, जगभरातील सर्वाधिक कठीण असणारे पासवर्ड अवघ्या काही सेंकदात क्रॅक झाले. जगभरातील 70 टक्के पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळेत उघड झाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.