AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zomato-Swiggy डिलिव्हरी होणार ठप्प ! इंधन महागाई विरोधात गिग वर्कर्सची संपाची घोषणा, केली ही मागणी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात गिग वर्कर्स युनियनने शनिवारी दुपारच्या वेळात ऐप बंद करुन संप करणार असल्याची घोषणा केली आहे.त्यामुळे डिलिव्हरी सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

Zomato-Swiggy डिलिव्हरी होणार ठप्प ! इंधन महागाई विरोधात गिग वर्कर्सची संपाची घोषणा, केली ही मागणी
Gig Workers Strike Petrol Price
| Updated on: May 15, 2026 | 7:44 PM
Share

Gig Workers Strike Petrol Price : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता याचा परिणाम ऐप आधारित डिलिव्हरी आणि कॅब सेवांवर पडला आहे. गिग प्लॅटफॉर्म सर्व्हीस वर्कर्स युनियनने (GIPSWU) वाढत्या इंधनाच्या किंमती विरोध करण्याची घोषणा केली आहे. युनियनने म्हटले आहे की शनिवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गिग वर्कर्स ऐप बंद करुन विरोध दर्शवणार आहेत.

पेट्रोल – डिझेल महाग झाल्याने सर्वात जास्त परिणाम डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हरवर पडत आहे. Swiggy, Zomato, Blinkit, Zepto, Ola, Uber आणि Rapido सारख्या कंपन्यासाठी काम करणारे लाखो वर्कर्स आपल्या कमाईसाठी संपूर्णपणे बाईक आणि स्कुटरवर अवलंबून आहेत. अशात इंधनाच्या किंमती वाढल्याने त्यांची रोजची बचत सतत कमी होत आहे.

20 रुपये प्रति किलोमीटर रेटची मागणी

युनियनने कंपन्यांकडे मागणी केली आहे की गिग वर्कर्ससाठी किमान २० रुपये प्रति किलोमीटर सर्व्हीस रेट निश्चित केला जावा. युनियनचे म्हणणे आहे की जेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात तेव्हा खर्च लगेच वाढतो, परंतू कंपन्या डिलिव्हरी चार्ज वा प्रति किलोमीटर मोबदला वाढवत नाही.

GIPSWU च्या अध्यक्ष सीमा सिंह यांनी सांगितले की भीषण उष्णतेत काम करणारे डिलिव्हरी वर्कर्स आधीच दबावाखाली आहेत. आता इंधन महाग झाल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांनी सांगितले की जर कंपन्यांनी फी वाढवण्याचा निर्णय घेतला नाही तर येत्या काळात आंदोलन आणखी वेगवान केले जाईल.

1 कोटीहून वर्कर्सवर परिणाम

युनियनचे नॅशनल कोऑर्डिनेटर निर्मल गोराना यांनी सांगितले की देशात सुमारे १ कोटी २० लाख गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत. यात फूड डिलिव्हरी, ग्रॉसरी डिलिव्हरी, लॉजिस्टिक्स आणि कॅब सेवांमध्ये जोडलेले लोक सामील आहेत.

त्यांनी सांगितले की पेट्रोल महाग झाल्याचा थेट परिणाम या वर्कर्सच्या कमाईवर पडतो. कारण त्यांनी त्यांच्या खिशातून पेट्रोल, गाडीची सर्व्हीस आणि इतर खर्च करावा लागत आहे.

सरकारकडे केली मागणी

संघटनेने सरकारकडे मागणी केली आहे की ऐप आधारित कंपन्यांना मोबदला फी वाढवण्याचे दिशा – निर्देश जारी करावेत, म्हणजे इंधन किंमतीचे ओझे वर्कर्सवर पडणार नाही.

संघटनेने म्हटले आहे की शुक्रवारी होणारे काम बंद आंदोलन हे शांततेत होणार आहे. याचा उद्देश गिग वर्कर्सच्या आर्थिक अडचणींना सरकार आणि कंपन्यांपर्यंत पोहचाव्यात…

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं