AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tattoo Man : टॅटूमुळे एकाच आठवड्यात आल्या jobच्या 7 offers! काय दावा केलाय या व्यक्तीनं? वाचा…

A man covered in tattoos : अनेकांना आपल्या शरीरावर टॅटू काढण्याचे वेड असते. अशाच एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण शरीरावर 33 लाख रुपयांहून अधिक किंमतीचे टॅटू काढले आहेत. टॅटूमुळे नोकरी (Job) मिळवणे सोपे जाते, असा दावा (Claim) त्याने केला आहे.

Tattoo Man : टॅटूमुळे एकाच आठवड्यात आल्या jobच्या 7 offers! काय दावा केलाय या व्यक्तीनं? वाचा...
शरीरावर टॅटू काढलेला कराक स्मिथ Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2022 | 1:08 PM
Share

A man covered in tattoos : अनेकांना आपल्या शरीरावर टॅटू काढण्याचे वेड असते. अशाच एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण शरीरावर 33 लाख रुपयांहून अधिक किंमतीचे टॅटू काढले आहेत. टॅटूमुळे नोकरी (Job) मिळवणे सोपे जाते, असा दावा (Claim) त्याने केला आहे. कराक स्मिथ असे या व्यक्तीचे नाव आहे. तो 41 वर्षांचा असून तो शेफिल्ड, यूकेचा (UK) रहिवासी आहे. त्‍याच्‍या बॉडी आर्टमुळे आठवड्यातून एकदा 7 जॉब ऑफर आल्याचा दावा त्‍याने केला आहे. कराकने वयाच्या 18व्या वर्षी पहिला टॅटू बनवला. आता तो दोन मुलांचा बाप आहे आणि त्याच्या शरीरावर 90 टक्के टॅटू आहेत. गाल आणि नाक वगळता. सध्या, कराक स्थानिक प्राधिकरणासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. तो टोळ्या आणि बंदुकांमध्ये गुंतलेल्या मुलांना योग्य दिशा देण्यास मदत करतो.

‘इतर समाजसेवकांपेक्षा मी वेगळा’

तो म्हणाला, की लोक नेहमी माझ्याबद्दल कमेंट करतात, की तुला नोकरी मिळणार नाही, असे अनेकजण छातीठोकपणे म्हणत असतात. पण मी कधीच बेरोजगार झालो नाही. कराक म्हणाला, की मी वयाच्या 18व्या वर्षांपासून काम करत आहे. एक वेळ अशी आली, की मला एकाच आठवड्यात 6 ते 7 नोकरीच्या ऑफर आल्या. कधीकधी मला असे वाटते की मला माझ्या टॅटूमुळेच नोकरी मिळते. कारण मी सामान्य समाजसेवकापेक्षा वेगळा दिसतो.

View this post on Instagram

A post shared by @tattedjesus

टीव्ही शोमध्येही सहभागी

कराक स्मिथ पुढे म्हणाला, की बरेच लोक मला मेसेज करतात आणि विचारतात की मी काय काम करतो? कारण त्यांनादेखील टॅटू काढायचा आहे मात्र यानंतर त्यांना नोकरी मिळणार नाही, असे त्यांना वाटते. जरी टॅटूमुळे त्याच्याकडे अनेक प्रकारच्या नोकऱ्या आहेत. जसे की मॉडेलिंग. तो लोकप्रिय टीव्ही शो टॉप बॉयमध्ये दिसत आहे. कराक म्हणाला, की लाइव्ह कॉन्व्हेन्शनमध्ये त्यांनी अनेक टॅटू मोफत करून घेतले. पण शरीरावर त्याला टॅटू बनवायला 33 लाखांपेक्षा जास्त रुपये लागले.

आणखी वाचा :

Vultures : कोणत्यातरी गंभीर विषयावर बोलावण्यात आलीय तातडीची बैठक, पाहा गिधाडांचा Viral video

Video : Miamiच्या रस्त्यावर भारतीय तरुणाच्या जबरदस्त Dance moves, परदेशी तरुणींनाही लावलं वेड

Sindhudurg : गोमूच्या खेळावरही पुष्पाचा Fever; हौशी कलाकार Srivalli गाण्यावर धरतायत ठेका!

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.