महिला हसत जायची त्याच्या घरात, बाहेर येताच व्हायची निराश! चार भिंतीतला चीड आणणारा कांड समोर?
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात महिला एका मौलानाच्या घरात हसत हसत जायच्या. पण बाहेर आल्यावर त्या कायम निराश वाटायच्या. आत नेमकं काय सुरु असायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया पूर्ण प्रकरण

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमा परिसरातून एक लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौकाही गावात राहणाऱ्या एका मौलानावर आरोप आहे की, तो जादूटोणा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली मुलींशी अश्लील कृत्ये करत होता. अनेक महिला या मौलानाकडे यायच्या. पण जेव्हा त्या घरात जायच्या तर पूर्णपणे निराश व्हायच्या. हे प्रकरण सुरुच राहिलं. एकेदिवशी मौलानाचा व्हिडीओ समोर येताच सत्य उघड झालं. नेमकं काय झालं जाणून घ्या…
व्हिडीओ व्हायरल
मौलानाच्या कृत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो जादूटोण्याच्या बहाण्याने मुलींना स्पर्श करत आणि त्यांच्याशी गैरकृत्ये करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच परिसरात खळबळ उडाली आणि प्रकरणाने मोठे स्वरूप घेतले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन मौलाना मुलींना आपले बळी बनवत होता. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड राग आहे आणि ते कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
वाचा: पुतिनला एकदाच सायको म्हणाली, नंतर मॉडेल BMWमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडली,नेमकं काय घडलं?
पोलिसांचा तपास सुरू
मोतीपूर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, व्हायरल व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणात आरोपी मौलानाचा शोध सुरू करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर गावात भीती आणि रागाचे वातावरण आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारची कृत्ये धार्मिक विश्वासाला ठेस पोहोचवतात. ते मागणी करत आहेत की, मौलानाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी.
