Video | काळा चष्मा लावून नवरी म्हणते ‘ले फोटू ले,’ भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

लग्न समारंभातील व्हिडीओ तर नेटकरी आवडीने पाहतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. नवरीने डोळ्यांवर चष्मा लावून नवरदेवासोबत मजेदार डान्स केला आहे.

Video | काळा चष्मा लावून नवरी म्हणते 'ले फोटू ले,' भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल
BRIDE AND GROOM DANCE

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ प्राणी, पक्ष्यांचे असतात. तर काही व्हिडीओंमध्ये माणसांनी केलेली धमाल दाखवलेली असते. लग्न समारंभातील व्हिडीओ तर नेटकरी आवडीने पाहतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. नवरीने डोळ्यांवर चष्मा लावून नवरदेवासोबत मजेदार डान्स केला आहे. (bride dancing with his groom before marriage video went viral on social media)

‘ले फोटू ले’ गाण्यावर भन्नाट डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. काही वेळात लग्नसमारंभ सुरु होणार आहे. त्याआधीनवरी आणि नवरदेव लग्नमंडपात एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही आहेत. नवी जोडी ‘ले फोटू ले’ या हरियाणवी भाषेतील गाण्यावर मजेदार डान्स करत आहे. नवरीचा डान्स तर विशेष पाहण्यासारखा आहे.

नतेवाईक डान्स पाहतच राहिले

नवरीने आपल्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा लावला आहे. तसेच नवदेवासमोर जाऊन नवरी मजेत डान्स करत आहे. ले फोटू ले या गाण्याच्या चालीवर ठुमके घेत नवरी नाचत आहे. नवरीचा डान्स पाहून नवरदेवालाही डान्स करण्याची इच्छा झाली आहे. आपल्या बायकोसोबत नवरदेवही डान्स करत आहे. या दोघांचा डान्स नातेवाईक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला असून त्याला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ तुम्हाला official_viralclips या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video: ‘त्याने रागा रागात हॉर्न दिला, याने त्यावर डान्स केला’, कार चालकाचं मुजोर ट्रक चालकाला भन्नाट प्रत्युत्तर

Video | भर रस्त्यात म्हणतोय लस घ्या…लस घ्या….माणसाच्या कारनाम्याची एकच चर्चा, व्हिडीओ व्हायरल

Video | लसीकरणाचा पुरावा मागितल्याचा राग, हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्याला तिघी जणींची मारहाण

(bride dancing with his groom before marriage video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI