Fact Check : UP पोलीस अधिकाऱ्याकडून भररस्त्यात तरुण-तरुणीच्या छातीत गोळी, व्हायरल व्हिडीओ मागील सत्य काय?

उत्तरप्रदेशातील एका पोलिसांनी ट्वीट करत या व्हिडीओची पोलखोल केली आहे. (Fact Check UP police shot dead on camera Video Viral)

Fact Check : UP पोलीस अधिकाऱ्याकडून भररस्त्यात तरुण-तरुणीच्या छातीत गोळी, व्हायरल व्हिडीओ मागील सत्य काय?
UP पोलीस अधिकाऱ्याकडून भररस्त्यात तरुण-तरुणीच्या छातीत गोळी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत उत्तरप्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याने एका तरुण-तरुणीवर गोळी मारल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांवर टीका केली जात होती. मात्र व्हायरल होणारा हा व्हिडीओ खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील एका पोलिसांनी ट्वीट करत या व्हिडीओची पोलखोल केली आहे. (Fact Check UP police shot dead on camera Video Viral)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील दावा काय?

या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी यांचे एका पोलीस अधिकाऱ्यासोबत जोरदार भांडण सुरु असते. यानंतर तो पोलीस अधिकारी त्या तरुणाला धक्का देतो. यानंतर रागाच्या भरात पोलीस त्याची बंदूक काढतो आणि थेट तरुणावर गोळी झाडतो. यानंतर त्याच्यासोबत त्याची मैत्रीण रडू लागते. ती त्या तरुणाच्या शेजारी जाऊन बसते. त्यानंतर पुढच्या काही सेकंदाने तो पोलीस तिच्यावरही गोळी झाडतो. एका फ्रेंड्स कॅफेच्या समोर ही घटना घडली आहे.

दावा खरा की खोटा? 

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राहुल श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. राहुल श्रीवास्तव यांनी केलेल्या फॅक्ट चेकनंतर हा व्हिडीओ खोटा असल्याचे समोर आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ हरियाणातील कर्नाल येथे एका कॅफेबाहेरील आहे. हा व्हिडीओ एका वेबसीरिजसाठी शूट करण्यात आला आहे. कर्नालजवळील फ्रेंड्स कॅफेच्या व्यवस्थापकांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.

(Fact Check UP police shot dead on camera Video Viral)

संबंधित बातम्या : 

Photo : सुट्टी मिळण्यासाठी अशीही शक्कल, 37 दिवसात एकाच मुलीसोबत चार वेळा लग्न आणि 3 वेळा घटस्फोट

Video | लॉकडाऊन संपल्यानंतर आनंद महिंद्रा काय करणार ? ‘हा’ व्हिडीओ अपलोड करत सांगितलं किती आनंद होणार

Video | आधी बर्फावर रॅम्प वॉक, नंतर असं घडलं की मध्येच वाघाची शिट्टी गुल; पाहा व्हिडीओ

Published On - 3:51 pm, Fri, 16 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI