नातू म्हणाला, हे माझ्या बापाचं घर आहे, मस्करी करणाऱ्या नातवाला आजी भन्नाट उत्तर

नेटकऱ्यांनी या व्हिडीओला फार पसंतीही दर्शवली आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ vibhorfitnesss या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे (Grandson Grandmother Video trending on Social Media)

नातू म्हणाला, हे माझ्या बापाचं घर आहे, मस्करी करणाऱ्या नातवाला आजी भन्नाट उत्तर
Grandson Grandmother Video
Namrata Patil

|

May 07, 2021 | 3:16 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. व्हायरल होणारे काही व्हिडीओ हे फार इमोशनल असतात. तर काही इतके मजेशीर असतात की हसून हसून आपलं पोट दुखू लागतं. सध्या इंटरनेटवर एका आजी आणि नातवाचा (Grandmother-Grandson) व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसण्यावर कंट्रोल करु शकत नाही. (Grandson Grandmother Video trending on Social Media)

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक नातू त्याच्या आजीचा व्हिडीओ काढत आहे. त्यावेळी तो मस्करीत आजीला सांगतो. आपण राहतो आहे ते घर माझे आणि माझ्या वडिलांचे आहे. हे ऐकल्यानंतर आजी चांगलीच भडकते. ती त्याच्यावर वैतागून घरातून निघून जा असेही सांगते.

आजी-नातवातील व्हिडीओतील संवाद

नातू – आजी तुला माहिती आहे का? मी तुझा नातू आहे. आजी – तू माझा नातू आहेस हे मला माहिती आहे. आजी – पण तुला नेमकं काय हवं आहे. नातू – हे माझ्या वडिलांचे घर आहे. आजी (वैतागून) – तुझे वडिल माझ्यानंतर आलेत. ते घर मी बनवले आहे. हे घर माझे आहे. तुम्ही जा येथून नातू- आम्ही कुठे जाणार आजी – मग असेच पडून राहा घरात

व्हिडीओ तुफान व्हायरल

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला फार पसंतीही दर्शवली आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ vibhorfitnesss या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओवर तुफान कमेंट्स आल्या आहे. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच त्यावर रिअॅक्टही केलं आहे. 

आतापर्यंत हा व्हिडीओ 10 लाखांहून अधिक जणांना बघितला आहे. यावर एका युजर्सने बिनधास्त दादी, क्यूट दादी अशी कमेंटही केली आहे. तर काहींनी या आजींना बघून मला माझ्या आजीची आठवण आली, अशी कमेंट केली आहे.

पाहा व्हिडीओ :

(Grandson Grandmother Video trending on Social Media)

संबंधित बातम्या  

Video | ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्द विसरले, अन् मुख्यमंत्री देशभरात ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें