AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकअप झालंय, टेन्शन येतंय?, तरुणांनो इंदोरीकर महाराजांचा हा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच

तरुण-तरुणींच्या प्रेमाविषयी सांगणारा इंदोरीकर महाराज यांचा एक व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडतोय. (indurikar maharaj love comedy viral video)

ब्रेकअप झालंय, टेन्शन येतंय?, तरुणांनो इंदोरीकर महाराजांचा हा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच
INDURIKAR MAHARAJ
| Updated on: Apr 06, 2021 | 8:56 PM
Share

मुंबई : तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण सगळेच डिजिटलाईज झालो आहेत. आजचं युग हे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूबचं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या डिजिटल माध्यमांवर अशा काही व्यक्ती आहेत, ज्या नेहमीच चर्चेत राहतात. त्यांच्या एकाका व्हिडीओची सोशल मीडियामध्ये नेहमीच खमंग चर्चा रंगलेली असते. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे यामध्ये अग्रस्थानी आहेत. त्यांच्या प्रत्येक कीर्तनाच्या हजारो क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होतात. घर, ग्रहस्ती, प्रेम, नातेसंबंध, दुनियादारी अशा कितीतरी विषयांवर ते समर्पकपणे आपले मत मांडतात. या सगळ्या गोष्टी मांडण्याची त्यांची विनोदी शैली तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते. तरुण-तरुणीच्या प्रेमाविषयी सांगणारा इंदोरीकर महाराज यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजतोय. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडतोय. (Indurikar Maharaj comment on love and breakup see full comedy viral video)

मागचं उकरुन काढू नका

आजकाल प्रेमी युगुलांमध्ये छोटछोट्या कारणांवरुन भांडणं होतात. अगदी छोट्या कारणावरुन ते थेट एकमेकांपासून वेगळं होण्याच्या निर्णयापर्यंत येतात. प्रियकर किंवा प्रेयसी जर सोडून गेली तर तणावात न जाता पुढे धैर्य़ाने चाला असं इंदोरीकर या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. तसेच “झालं ते झालं. पोरांनो समजा एखाद्या पोरीने तुम्हाला धोका दिला तर तो विषय जागेवर सोडून द्या. नाहीतर टेन्शनने मरुन जाल,” असं इंदोरीकर या व्हिडीओमध्ये तरुणांना विनोदबुद्धीने  सांगतात.  टेन्शन घेऊ नका हे सांगण्याची इंदोरीकर महाराज यांची शैली अगदीच खास आहे. टेन्शन घेऊन मराल म्हटलं की खाली बसलेले लोक जोरात हसताना या व्हिडीओमध्ये दिसतात.

पाहा व्हिडीओ :

मोबाईल वापरणारी मंडळी सायकोलॉजीकली अनफीट

आजकाल तरुण-तरुणींमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. याच मोबाईल अ‌ॅडिक्शनला घेऊन इंदोरीकर महाराजांनी या व्हिडीओमध्ये नवतरुणांना चांगलेच झापले आहे. त्यांनी मोबाईल अती प्रमाणात वापरणाऱ्यांना सायकोलॉजिकली अनफीट असल्याचे म्हटले आहे. “काही पोरं मोबाईमुळे भ्रमिष्ट झाले. त्यांना व्हायरस आला आहे. मोबाईल वापरणारे पोरं दरिद्री असतात. त्यांच्याकडे 9 हजारांचे मोबाईल असतात, कानात वायर घालून ते त्यांच्यात विश्वात असतात,” असे ते उपहासात्मक पद्धतीने या व्हिडीओमध्ये लोकांना सांगत आहेत.

दरम्यान, प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून इंदोरीकर महाराज यांची ओळख आहे. मात्र, याच कीर्तनांमदरम्यान काही कथित आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीकादेखील केलेली आहे. मात्र, तो मुद्दा जरा बाजूला ठेवला तर त्यांच्या अनेक कीर्तनांमधून मनोरंजन, माहिती, ज्ञान असं सगळंच मिळतं. त्यांचा हा व्हिडीओ तर पाहावा असाच आहे.

इतर बातम्या :

Video | हवेत उडी घेणाऱ्या तरुणाचा खतरनाक स्टंट; IPS अधिकार म्हणातो सुरुवातीला अशक्य वाटतं पण नंतर…

VIDEO: जम्मू काश्मीरमध्ये सर्वांसमोर बिबट्याचा एकावर हल्ला, कुणाचीही हिंमत झाली नाही, अखेर एकाच्या हिमतीने जीव वाचला

Video | इंजिनिअरिंग म्हणजे काय रे भाऊ?, कॉपी करुन पास होणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहाच

(Indurikar Maharaj comment on love and breakup see full comedy viral video)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.