AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | इंजिनिअरिंग म्हणजे काय रे भाऊ?, कॉपी करुन पास होणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहाच

मी उद्योजक या एकू यूट्यूब चॅनेलवरील शरद तांदळे यांचा एक व्हिडीओ चांगलाच पाहिला जातोय. (sharad tandale speech video)

Video | इंजिनिअरिंग म्हणजे काय रे भाऊ?, कॉपी करुन पास होणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहाच
शरद तांदळे, (सोअर्स- यूट्यूब)
| Updated on: Apr 06, 2021 | 7:09 PM
Share

मुंबई : सध्याचं जग हे डिजीडलाईज झालं आहे. समस्त जगातील ज्ञान आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध होतं. यामध्ये आपल्याला कधी उदासवाणं वाटलं तर आपण क्षणात यूट्यूबरवर सर्च करुन कॉमेडी व्हिडीओ पाहतो. सर्वांना पोट धरून हसायला लावणारे आणि सर्वांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त करणारे अनेक मराठी वक्ते आपल्याला माहीत आहेत. मात्र, तरुणांना उद्योगधंदे, व्यापार, स्वत:चा व्यवसाय उभा करण्यास प्रोत्साहित करणारे शरद तांदळे यांची गोष्ट काही निराळीच आहे. ते ग्रामीण बोलीचा वापर करुन अनेकांना खळखळून हसायला तर लावतातच. पण अनेक तरुणांना ते प्रोत्साहित करण्याचं कामसुद्धा ते तेवढ्या खुबीने करतात. सध्या मी उद्योजक या एका यूट्यूब चॅनेलवरील त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच पाहिला जातोय. त्यांच्या या व्हिडीओला फक्त तीन दिवसांत तब्बल 41 हजार वेळा नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. (Sharad Tandale comedy and inspirational speech video goes viral seel full video)

शरद तांदळेंच्या भाषणाच महाराष्ट्रभर चर्चा

शरद तांदळे यांची भाषणं अनेकांना नवी स्फूर्ती देतात यात काही शंका नाही. त्यांच्या या भाषणाची महाराष्ट्रभर चर्चा होते. मात्र, त्यांनी भाषणादरम्यान सांगितलेल्या चुटकुल्यांचीसुद्धा तेवढीच चर्चा होते. व्हॉट्सअ‌ॅप, फेसबूक तसेच यूट्यूबर त्यांच्या भाषणाच्या क्लिप चांगल्याच व्हायरल होतात. त्यांनी सांगितलेले किस्से आणि रोजच्या जीवनातील त्यांनी दिलेले उदहरणं आपल्याया पोट धरुन हसायला लातात. त्यांच्या भाषण करण्याच्या खास शैलीमुळे लोक त्यांच्या जून्या भाषणाचे व्हिडीओ वेगवेगळ्या माध्यमातून शेअर करतात.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

शरद तांदळे शुद्ध भाषेचा आव न आणता ग्रामीण भाषेत थेट आणि स्पषट्पणे बोलतात. त्यांच्या याच शैलीमुळे अनेकजण त्यांचे भाषण आनंदाने पाहतात. या व्हिडीओमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग म्हणजे काय?, हे अगदीच मजेशीर भाषेत सांगितलं आहे. इंजिनिअरिंगमध्ये असताना त्यांनी काय काय चुका केल्या, कशा प्रकारे फजिती झाली हे त्यांनी रंजकपणे सांगितलं आहे.

शरद तांदळे यांचा व्हिडीओ :

वाचनाची सवय लावा

शरद तांदळे यांनी आपल्या या भाषणात इंजिनिअरिंगच्या मुंलांची काय स्थिती असते हे तर सांगितलं आहेच. पण त्यांचबरोबर वाचनाचे काय फायदे आहेत, हे सुद्धा त्यांनी अतिशय मार्मिकपणे सांगितलं आहे. दुकानाच्या पाट्या, पेपरची पानं, जे मिळेल ते वाचा असं तांदळे सांगतात. तसेच वाचण्याशिवाय पर्याय नाही, सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचण्यास सुरुवात करा असंही त्यांनी राज्यातील तरुणांना या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे..

आणि आपल्या खिशात रुपया नाही…

या व्हिडीओमध्ये भाषण करताना शरद तांदळे आजच्या तरुणांवर मार्मिकपणे भाष्य करतात. आजचा तरुण दोन पुस्तकं वाचून, एखाद्या संघटनेच्या प्रभावाखाली येऊन मोठीमोठी भाष्यं करतो. तो देशातील मोठ्या नेत्यांना काहीही काही कळत नाही असं आजचा तरुण सहजपणे सांगून जातो, असं म्हणत तांदळे तरुणांनी आधी आपला व्यासंग वाढवण्याची गरज असल्याचे सांगतात. हा व्हिडीओ आपल्याला खळखळून हसायला तर लावतोच, पण त्याचबरोबर या व्हिडीओमधील त्यांच्या भाषणात ते तरुणांच्या सर्वांगीण विकासाविषयी सांगतात. सर्वांनी एकदा हा व्हिडीओ पाहायलाच हवा.

इतर स्टोरीज :

VIDEO: ‘कोरोना लसीचा पावर, थेट धावत्या रेल्वेला लाथ मारली’, तुम्ही व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलाय?

VIDEO | ट्राफिक जॅममुळे बाचाबाची, नगराध्यक्षांनी कानाखाली पेटवल्याने भररस्त्यात हाणामारी

मजुरांचं पोट भरावं म्हणून विकते 1 रुपयाला इडली, लवकरच मिळणार हक्काचं घर, आनंद महिंद्रा मदत करणार

(Sharad Tandale comedy and inspirational speech video goes viral seel full video)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.