सीलिंग फॅन झाला मळकट? फक्त 2 साहित्यांनी घरातच तयार करा क्लीनिंग सोल्यूशन
पंखा स्वच्छ असणं हे घराच्या सौंदर्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी तयार केलेल्या या उपायामुळे न फक्त वेळ आणि पैसा वाचेल, तर घरातील स्वच्छताही टिकून राहील.

आजकाल प्रत्येक घरात सीलिंग फॅनचा वापर होतोच, पण त्यावर जमा होणारी जाड धूळ आणि चिकट मळ त्रासदायक ठरते. अनेकांना वेळेअभावी फॅन साफ करणं जमत नाही आणि पाहुण्यांसमोर त्याची लज्जास्पद स्थिती होते. पण आता काळजी करू नका! घरच्या घरी बनवता येणाऱ्या एका सोप्या क्लीनिंग सोल्युशनमुळे पंखा आरशासारखा चमकेल. या घरगुती उपायात फक्त बेकिंग सोडा आणि सिरक्याची गरज आहे, आणि तुमचं काम होईल काही मिनिटांतच. चला तर मग, जाणून घ्या हे सोपं आणि प्रभावी क्लीनिंग हॅक
साहित्य:
1. एक चमचा बेकिंग सोडा
2. एक वाटी सफेद सिरका (vinegar)
3. एक स्प्रे बॉटल
4. एक कोरडा आणि स्वच्छ सूती कपडा
क्लीनर कसा तयार कराल?
एका बाऊलमध्ये सफेद सिरका घ्या आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. दोन्ही एकत्र मिक्स करा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये ओता. आता पंख्यावर जिथे धूळ जास्त आहे तिथे हे स्प्रे करा. काही मिनिटांनी सूती कपड्याने स्वच्छ पुसा. पंखा पुन्हा एकदा नवा वाटायला लागेल, इतका स्वच्छ आणि चमकदार होईल.
क्लीनिंग करताना घ्या ह्या काळजी:
1. साफसफाईपूर्वी नेहमी फॅन बंद करा.
2. मोटर किंवा वायरिंगजवळ ओला कपडा वापरणं टाळा.
3. सावधगिरी म्हणून शीढीचा वापरा करा.
4. पंख्यावर खूप दाब दिल्यास तो वाकू शकतो किंवा नुकसान होऊ शकतं, त्यामुळे पंखा हलक्या हताने पुसा.
नोकरदारांसाठी सोपी ट्रिक
जे लोक ऑफिसमध्ये बिझी असतात आणि साफसफाईसाठी वेळ मिळत नाही, त्यांनी ही ट्रिक महिन्यातून एकदा वापरली, तरीही त्यांचा पंखा कायम स्वच्छ राहील. हे सोल्यूशन वापरणं सोपं, सुरक्षित आणि खर्चिकही नाही. शिवाय बाजारातल्या क्लीनिंग प्रोडक्ट्सपेक्षा हे अधिक नैसर्गिक आणि केमिकल फ्री आहे.
फॅन क्लीनींग साठी आनखी 5 घरगुती टिप्स
1. जुन्या उशाच्या कव्हरचा वापर करून ब्लेडवर साचलेली धूळ एका दिशेने खेचून साफ करा. धूळ खाली न सांडता कव्हरमध्येच राहते.
2. सुरक्षा लक्षात घेऊन नेहमी मेन स्विच बंद करूनच स्वच्छता करा, आणि शक्य असल्यास स्टूल किंवा मजबूत खुर्चीचा वापर करा.
3. ब्लेडवर खूप दबाव टाकू नका, अन्यथा ते वाकू शकतात. सौम्यतेने स्वच्छ करा.
4. दर दोन आठवड्यांनी फक्त कोरड्या कपड्याने ब्लेड पुसल्यास मोठी साचलेली धूळ होणार नाही
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
