AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIP दररोज, आठवड्याला की महिन्याला? गुंतवणुकीचा योग्य पर्याय कोणता? जाणून घ्या

SIP (Systematic Investment Plan) म्हणजे नियमित अंतराने गुंतवणूक करण्याची शिस्तबद्ध पद्धत. पण दररोज, आठवड्याला की महिन्याला गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर? प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे वेगळे आहेत. मग तुमच्या गुंतवणूक उद्दिष्टांनुसार योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे.

SIP दररोज, आठवड्याला की महिन्याला? गुंतवणुकीचा योग्य पर्याय कोणता? जाणून घ्या
sip
| Edited By: | Updated on: May 17, 2025 | 4:00 PM
Share

म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करणे हा आजकाल एक लोकप्रिय आणि शिस्तबद्ध मार्ग बनला आहे. ठराविक रक्कम नियमित अंतराने गुंतवल्याने दीर्घकाळात चांगली संपत्ती निर्माण होऊ शकते. SIP तुम्ही दररोज, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला करू शकता. पण मग प्रश्न पडतो की, यापैकी कोणत्या प्रकारच्या SIP मधून आपल्याला खरोखर जास्त चांगला परतावा मिळू शकतो? अनेकांच्या मनात याबद्दल गोंधळ असतो की जास्त वेळा पैसे भरल्याने फायदा जास्त होतो का.

गणितानुसार कोणता आहे योग्य पर्याय ?

गुंतवणुकीमध्ये कोणताही नफा हा निश्चित नसतो; तो पूर्णपणे बाजारातील कामगिरीवर अवलंबून असतो. तरीही, एका साध्या उदाहरणाने आपण एक अंदाज घेऊ शकतो. समजा, तुम्ही ५ वर्षांच्या कालावधीसाठी दर महिन्याला ५,००० रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला सरासरी १२% Interest मिळाले. या परिस्थितीत, जर तुम्ही Monthly SIP केली, तर तुमची एकूण जमा झालेली रक्कम व्याजासह अंदाजे ४.१२ लाख रुपये होऊ शकते. हीच गुंतवणूक जर तुम्ही Weekly SIP म्हणजेच दर आठवड्याला केली, तर तुमची रक्कम साधारणपणे ४.४५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. आणि जर तुम्ही Daily SIP म्हणजेच दररोज केली, तर ती रक्कम जवळपास ४.१५ लाख रुपये होऊ शकते. या गणितानुसार, Weekly SIP थोडा अधिक परतावा देताना दिसत आहे, त्यानंतर Daily SIP आणि मग Monthly SIP चा क्रमांक लागतो.

जरी Weekly SIP मध्ये आकड्यांच्या दृष्टीने थोडा जास्त परतावा दिसत असला, तरी हा फरक खूप मोठा नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याहूनही महत्त्वाचे काही व्यावहारिक मुद्दे आहेत ज्यांचा विचार करणे गरजेचे आहे. रोज किंवा दर Weekly SIP करणे हे प्रत्येकाला Convenient आणि Manageable असेलच असे नाही. यासाठी तुम्हाला जास्त वेळा Transactions करावे लागतात, ज्याचा मागोवा ठेवणे आणि खात्री करणे थोडे किचकट वाटू शकते. याउलट, Monthly SIP ही तुमच्या पगाराच्या तारखेला किंवा महिन्याच्या इतर कोणत्याही सोयीच्या दिवशी सेट करणे खूप सोपे असते. यामुळे SIP नियमितपणे चालू राहण्याची आणि त्यात खंड न पडण्याची शक्यता जास्त असते.

तुम्ही SIP चा कोणताही प्रकार निवडा… Daily, Weekly किंवा Monthly, पण जर तुमची गुंतवणूक Long Term साठी असेल, तर तिन्ही प्रकारांमध्ये चांगला परतावा मिळवण्याची क्षमता असते. SIP चा खरा फायदा ‘Rupee Cost Averaging’ या संकल्पनेत आहे. याचा अर्थ, बाजारात तेजी असो वा मंदी, तुमची गुंतवणूक नियमितपणे चालू राहिल्यामुळे तुम्हाला सरासरी खरेदी किमतीचा फायदा मिळतो आणि बाजारातील चढ-उतारांचा धोका कमी होतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Consistency. तुम्ही निवडलेली SIP न चुकता, नियमितपणे आणि दीर्घकाळ चालू ठेवणं, हेच चांगला परतावा मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.

तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.