Video | प्रेम म्हणजे प्रेम असतं ! दिव्यांग प्रियकराने केले खास शैलीत प्रपोज, प्रेयसीने काय केलं एकदा पाहाच !

दिव्यांग व्यक्तीचा प्रपोज करतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रपोज करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचे नाव जोश स्मिथ आहे.

Video | प्रेम म्हणजे प्रेम असतं ! दिव्यांग प्रियकराने केले खास शैलीत प्रपोज, प्रेयसीने काय केलं एकदा पाहाच !
PROPOSAL VIRAL VIDEO

मुंबई : असं म्हणतात की प्रेमाला काही सीमा नसते. प्रेम कधीही कोणावरही होऊ शकतं. तसेच प्रेमाच्या शक्तीसमोर जात, धर्म तसेच अपंगत्वसुद्धा नाहीसं होतं. त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका दिव्यांग व्यक्तीने त्याच्या प्रेसयीला खास शैलीत प्रपोज केलं आहे. विशेष म्हणजे या तरुणीनेसुद्धा हुरळून जात तिच्या प्रियकराचे लग्नाचे प्रपोजल स्वीकारले आहे. दिव्यांग व्यक्तीचा प्रपोज करतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रपोज करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचे नाव जोश स्मिथ आहे. (paralyzed man propose his girlfriend uniquely video went viral on social media)

अपघातामुळे अवयवांची हालचाल करणे अशक्य

मिळालेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पोहत असताना जोश स्मिथ यांचा अपघात झाला या अपघातानंतर त्यांच्या शरीराचा काही भाग संवेदनाहीन झाला. स्मीथ यांना त्यांच्या काही अवयवांची हालचाल करणे शक्य होत नव्हते. तेव्हापासून स्मिथ यांचं आयुष्यच बदलून गेलं.

सिनेस्टाईल प्रेयसीला प्रपोज केले

मात्र, स्मिथ यांच्या आयुष्यात त्यांची प्रेयसी होती. या प्रेसयीवर त्यांचे खूप प्रेम होते. शेवटी धाडस करुन स्मीथ यांनी त्यांच्या प्रेयसीला प्रपोज केले. अगदी हिरो जशा पद्धतीने मुलींना प्रपोज करतो, तशाच पद्धतीने स्मीथ यांनी त्यांच्या प्रेयसीला प्रपोज केले. आपला प्रियकर त्याच्या शरीराची व्यवस्थितपणे हालचाल करु शकत नसला तरी, त्याने मला प्रपोज करण्यासाठी एवढा प्रयत्न केल्याचे पाहून स्मीथ यांची प्रेयसी हुरळून गेली. तिने लगेच स्मीथ यांना होकार दिला.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ समोर आला आहे. स्मीथ यांनी प्रपोज करताना त्यांच्या प्रेयसीचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. स्मीथ यांनी केलेल्या प्रपोजचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | रस्त्यावर पाणी, मोठे दगड, खांद्यावर दुचाकी घेऊन पठ्ठ्या निघाला; ‘बाहुबली’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा

Video | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल

(paralyzed man propose his girlfriend uniquely video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI