नवी दिल्ली : नोकरी किंवा व्यावसायाच्या ठिकाणी उशीर (Late) झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल तर थांबा. काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्यावर हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो. अनेक ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी विविध फलक लिहिले असतात. पण दिवसभराच्या घाईत कुणाला ते फलक वाचण्याची इच्छा होत नसते. नेमकी हीच चूक आपल्याला मृत्यू (Death)च्या जबड्यात कशी लोटू शकते, याची प्रचिती सोशल मीडियात व्हायरल (Viral) झालेल्या एका व्हिडिओमधून आली आहे.