मध्यरात्री 3 वाजता किट्ट काळोखात मुलीच्या खोलीतून आवाज आला… कपाटातून निघाले दोन हात… समोरचं दृश्य पाहून… काय घडलं त्या अंधाऱ्या खोलीत?
एक माणूस रात्री 3 वाजता त्याच्या मुलीच्या खोलीत गेला, कारण त्याला तिथून एक विचित्र हास्य ऐकायला येत होतं. पण तिथे गेल्यावर त्याने जे दृश्य पाहिलं, त्याच्या अंगावर तर काटाच उभा राहिला.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांना धक्का बसला आहे आणि काहीजण घाबरले देखील. या व्हिडिओमध्ये, एक माणूस रात्री 3 वाजता त्याच्या मुलीच्या खोलीत गेला, कारण त्याला तिथून एक विचित्र हास्य ऐकायला येत होतं. पण तिथे गेल्यावर त्याने जे दृश्य पाहिलं, त्याच्या अंगावर तर काटाच उभा राहिला. कोणी दुसरी व्यक्ती तिथे असती, तर त्याचीदेखील तशीच हालत झाली असती.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी खोलीतील कपाटाच्या शेजारी जमिनीवर एकटी बसलेली दिसते. सुरुवातीला त्या व्यक्तीला वाटले की सर्व काही ठीक आहे, पण नंतर अचानक कपाटातून दोन भितीदायक हात बाहेर आले आणि मुलीच्या केसांशी खेळू लागले. हे पाहून तो माणूस खूप घाबरला आणि आपल्या मुलीकडे त्याने धाव घेतली, पण तोपर्यंत हात गायब झाले होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथून हात बाहेर येताना दिसत होते तिथे फक्त एक बाहुली पडली होती. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की तो माणूस त्याच्या मुलीला हाक मारतो आणि तिला हलवतो, पण मुलगी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बसते, जणू तिला काहीच कळत नाही.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @scaryencounter नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही पाऊस पडला असून बहुतेक नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तथापि, हा व्हिडिओ कधी आणि कुठे रेकॉर्ड केला गेला याबद्दल कोणतीही माहिती नाही.
व्हायरल व्हिडीओ
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
मला वाटते की बाहुली पछाडलेली आहे, असं एका युजरने लिहीलं. तर दुसऱ्याने म्हटलं की, मी रात्री हा व्हिडिओ पाहिला, माझ्या अंगावर तर भीतीने काटच आला. हे घर ताबडतोब स्वच्छ आणि शुद्ध करणे आवश्यक आहे, असा सल्लाच आणखी एका यूजरने दिला.
मात्र, अनेक नेटिझन्सन हा व्हिडिओ बनावट वाटतो. काही जण म्हणाले की, असं काही झालं तर कोणताही बाप आपल्या मुलीला वाचवण्यापूर्वी तिचा व्हिडिओ का बनवेल? खरंच असं काही झालं तर कोणत्याही बापाने आधी तिथे धाव घेऊन मुलीला उचलून पळ काढला असतात, तिथेच बसून तिला हलवत बसला नसता. अशा विविध कमेंट्स यावर आल्या आहेत.
डिस्क्लेमर : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या आधारे ही बातमी लिहिली गेली आहे. टीव्ही 9 मराठी या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
